शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजातील तीन रूग्णालय होणार बंद

By admin | Updated: April 17, 2017 01:30 IST

क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट नुसार नियमांना धाब्यावर बसूवन नियमबाह्य रूग्णांची शस्त्रक्रिया करणाऱ्या देसाईगंज शहरातील

तपासणी : आॅपरेशन थिएटरची परवानगी नाही देसाईगंज : क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट नुसार नियमांना धाब्यावर बसूवन नियमबाह्य रूग्णांची शस्त्रक्रिया करणाऱ्या देसाईगंज शहरातील तीन खासगी रूग्णालयांकडे शस्त्रक्रिया थिएटरची रितसर परवानगीच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबतचा अहवाल सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर होणार आहे. त्यामुळे देसाईगंज शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. १५ मार्च २०१७ पासून देसाईगंज शहरात ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरिक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या समितीने खासगी रूग्णालयांची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीदरम्यान बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून दवाखाना थाटणाऱ्या डॉक्टरांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आॅपरेशन थिएटरची नोंदणीच केली नाही. पीसीपीएनडीटी रेकॉर्ड उपलब्ध नाही. पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र नाही. रूग्णालयामध्ये जीएनएम कर्मचारी नाही. देसाईगंज नगर परिषदेचेही नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही. अग्नी सुरक्षा प्रमाणपत्र सुध्दा उपलब्ध नाही. काही रूग्णालयांनी तर जिल्हा शल्य चिकित्सकांकडून घेतलेली परवानगी सुध्दा कालबाह्य झाली आहे. मात्र त्यांनी अजूनपर्यंत नोंदणीचे नुतनीकरण केले नसल्याचे तपासणीत दिसून आले आहे. (वार्ताहर)