शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासाठी जिल्ह्यात 50 चालक हाेणार रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळेत येण्याची समस्या निर्माण झाली आहे. बस उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा म्हणून एसटी व्यवस्थापन खासगी एजन्सीमार्फत एसटी चालकांची नियुक्ती करीत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : येत्या आठ दिवसात गडचिराेली विभागाला ५० चालक उपलब्ध हाेणार आहेत. यातील बहुतांश चालकांच्या मदतीने मानव विकास मिशनच्या बसफेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर हाेणार असली तरी सामान्य प्रवाशांचे हाल मात्र अजुनही कायम आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळेत येण्याची समस्या निर्माण झाली आहे. बस उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा म्हणून एसटी व्यवस्थापन खासगी एजन्सीमार्फत एसटी चालकांची नियुक्ती करीत आहे. गडचिराेली विभागाला ५० चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातील काही चालक साेमवारी रुजू हाेणार आहेत. 

जिल्हाधिकारी आग्रही-    बसअभावी विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी संजय मिना यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार एसटी प्रशासन सर्वप्रथम मानव विकास मिशनच्या बस सुरू करणार आहे. 

वाहकांचे काय? चालक रुजू हाेणार असले तरी वाहकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे काही एसटीच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर वाहकाची जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानव विकास मिशनच्या बसेसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींकडे पास राहते. त्यामुळे त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करण्याची गरज पडत नाही. परिणामी वाहकाशिवाय बसेस चालविता येणार आहेत. 

सामान्य नागरिकांचे हाल सुरूच एसटीचा संप लांबतच चालला आहे. जुने कर्मचारी कामावर रुजू हाेण्यास तयार नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. शासनाने चालकांप्रमाणेच वाहकांचीही नियुक्ती करावी. जाहिरात काढल्यास लाखाे बेराेजगार एसटीत नाेकरी करतील. चालक भरतीबराेबरच आता वाहकांची भरती सुध्दा करावी लागणार आहे.

२२ फेब्रुवारीच्या सुनावणीकडे लक्ष एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. १८ फेब्रुवारीला अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. त्यानंतर २२ फेब्रुवारीला यावर सुनावणी हाेणार आहे. अहवालात काय म्हटले आहे, सुनावणीदरम्यान निकाल लागणार काय, याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

५० चालक देण्याचे पत्र प्राप्तगडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून देण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. साेमवारपासून काही चालक रूजू हाेतील. या चालकांच्या मदतने सर्वप्रथम मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या जातील.- अशाेककुमार वाडीभस्मे, विभागीय नियंत्रक, गडचिराेली

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप