शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात २४ तलाठी साजे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:02 IST

शासनाने सध्या अस्तित्वात असलेल्या महसूल मंडळ व तलाठी साजाची विभागणी करून नवे महसूल मंडळ व तलाठी साजे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचार महसूल मंडळ : शेतकरी व विद्यार्थ्यांची थांबणार पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शासनाने सध्या अस्तित्वात असलेल्या महसूल मंडळ व तलाठी साजाची विभागणी करून नवे महसूल मंडळ व तलाठी साजे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धानोरा तालुक्यात नव्याने २४ तलाठी साजे व चार महसूल मंडळ होणार आहेत.सद्य:स्थितीत धानोरा तालुक्यात २२८ गावे असून २४ तलाठी साजे व चार महसूल मंडळ आहेत. नवे व जुने मिळून एकूण ४७ तलाठी साजे व आठ महसूल मंडळांची निर्मिती होणार आहे. धानोरा तालुक्यात नवरगाव, गिरोला, कटेझरी, कुलभट्टी, सुरसुंडी, फुलबोडी, मंगेवाडा, तुकूम, मिचगाव बु. साखेरा, कोंदावाही, पुस्टोला, जप्पी, मुरगाव, चव्हेला, चिचोली, जांगदा, मिचगाव (झाडा), मुंगनेर, मोहगाव, सावंगा, कामनगड व झाडापापडा या ठिकाणी नवीन तलाठी साजे निर्माण करण्यात येणार आहे. तसेच रांगी, कारवाफा, गट्टा, सुरसुंडी हे नवे चार महसूल मंडळ कार्यालय निर्माण करण्यात येणार आहे. या नव्या साजा संदर्भात आक्षेप असल्यास संबंधितांनी २५ सप्टेंबरपूर्वी आक्षेप तहसील कार्यालयात नोंदवावे, अशी माहिती धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी दिली आहे. लोकमतने यापूर्वीच हिवाळी अधिवेशनादरम्यान धानोरा तालुक्यात नवे तलाठी साजे निर्माण करण्यात यावे, अशा मागणीचे वृत्त प्रकाशित करून सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने याची दखल घेतले असल्याने महसूल मंडळाच्या कारभारात व कार्यात सुसूत्रता व गती येणार आहे.गडचिरोलीत चार साज्यांची निर्मिती होणारगडचिरोली तालुक्यात चांदाळा, देवापूर, राजोली व मारदा या चार ठिकाणी नव्याने तलाठी साजे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी सोयीचे होणार आहे.