शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

सिकलसेलबाबत अजूनही फारशी जागृती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:55 IST

सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील नागरिकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे दोन हजारपेक्षा अधिक रूग्ण सिकलसेलग्रस्त असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देदोन हजारपेक्षा अधिक रूग्ण : शासनाकडून मिळणाऱ्या सोईसुविधा तोकड्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील नागरिकांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यामध्ये सुमारे दोन हजारपेक्षा अधिक रूग्ण सिकलसेलग्रस्त असल्याचे आढळून आले आहे.सिकलसेल हा रक्तातल्या लाल रक्तपेशीमध्ये होणारा आजार आहे. आपल्या रक्तात लाल पेशी व पांढºया पेशी अशा दोन प्रकारच्या पेशी आहेत. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. पण सिकलसेल आजारामध्ये या पेशींचा आकार आॅक्सिजनचा पुरवठा मिळत नसल्याने विळ्यासारखा होतो. इंग्रजी भाषेत विळ्याला सिकल म्हणतात व सेल म्हणजे पेशी म्हणून या आजाराला सिकलसेल आजार असे संबोधले जाते. सिकलसेल आजार अनुवांशीक आहे. गर्भधारनेच्यावेळी जेनेरीक बदलामुळे हा आजार होतो. रक्तदोषामुळे उद्भवणारा हा दुर्धर आजार आहे. जन्मानंतर सिकलसेल रूग्णांच्या स्पर्शाने, त्याचे उष्टे अन्न खाल्याने, कपडे वापरल्याने, शारीरिक संबंध किंवा रक्त दुसºयास संक्रमित केल्याने दुसºया व्यक्तीला सिकलसेल आजार होत नाही. आई किंवा वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक व ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह करणे टाळावे. सिकलसेल वाहक व्यक्ती (एएस) व सिकलसेलग्रस्त व्यक्ती असे दोन प्रकार सिकलसेल रूग्णांचे पडतात. राज्यात गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जवळगाव, धुळे, नंदूरबार, रायगड, नांदेड, हिंगोली, पालघर या जिल्ह्यांमध्ये सिकलसेलग्रस्तांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेलग्रस्तांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.सिकलसेलवरील उपाययोजनासिकलसेल हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारीत होते. त्यामुळे लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांनीही सिकलसेल रक्ताची तपासणी करावी, सिकलसेल रूग्ण जन्माला येऊ न देण्याचे टाळावे, सिकलसेलवाहक व पीडित व्यक्तीने दुसºया वाहक व पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे, सिकलसेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक अ‍ॅसीडची गोळी सेवन करावी.सिकलसेलग्रस्तांना शासनाकडून मिळणाऱ्या सोईसुविधासिकलसेलग्रस्तांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ६०० रूपये अनुदान दिले जाते. या रूग्णांना दररोज मोफत फॉलिक अ‍ॅसीड गोळ्या, रक्त पुरवठा, औषध व उपचार प्रदान करण्यात येते. राज्य रक्तसंक्रमण परिषद मुंबईकडून सिकलसेल ओळखपत्र तयार करून दिला जातो. दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रती तास २० मिनिटे अधिकचे दिले जातात.सिकलसेलची लक्षणेहातापायावर सूज येणे, सांधे सूजणे, दुखणे, असह्य वेदना होणे, सतत सर्दी, खोकला होणे, अंगात बारीक ताप राहणे, डोळे पिवळसर दिसणे, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.