शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी अनुदान नाही

By admin | Updated: September 26, 2016 01:30 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या गडचिरोली येथील जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाला बिनव्याजी कर्ज वाटपासाठी

दोन वर्ष उलटले : १०७ लाभार्थी वंचितगडचिरोली : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या गडचिरोली येथील जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाला बिनव्याजी कर्ज वाटपासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून न दिल्याने तब्बल दोन वर्षांपासून कर्ज मंजूर झालेले १०७ बेरोजगार लाभार्थी लघु उद्योगापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कर्ज मंजूर झालेले अनेक लाभार्थी कर्जाच्या रक्कमेसाठी या कार्यालयात वारंवार चकरा मारून थकले आहेत.सहायक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयाच्या प्रशस्त इमारतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक कार्यालय आहे. या महामंडळांतर्गत लघु उद्योग सुरू करण्यासाठी मादगी, मांग, मातंग समाजातील बेरोजगारांना ५० हजार रूपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली आहे. सदर कर्ज प्रकरणासाठी शेकडो बेरोजगारांनी या कार्यालयात सर्व कागदपत्रानिशी सन २०१२-१३ या वर्षात अर्ज सादर केले. कागदपत्रांची पडताळणी करून गडचिरोली जिल्ह्यातील १०७ बेरोजगार युवक व महिलांचे कर्ज प्रकरण २०१४ मध्ये मंजूर करण्यात आले. तसे मुंबईच्या महामंडळ कार्यालयाकडून गडचिरोली कार्यालयाला पत्रही प्राप्त झाले. त्यानंतर येथील प्रादेशिक व्यवस्थापकाने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ नागपूर कार्यालयास विनंती पत्र लिहून १०७ लाभार्थी उमेदवारांना कर्ज वाटप करण्यासाठी ५३ लाख ५० हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. मात्र त्यानंतरही शासनाकडून बेरोजगारांना कर्ज वाटप करण्यासाठी अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नाही. त्यामुळे बेरोजगार युवक व महिला लघुउद्योग सुरू करण्यापासून वंचित आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर होऊनही १०७ बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले नाही. या संदर्भात आम्ही शिष्टमंडळ घेऊन जिल्हा व्यवस्थापक तसेच अनेक लोकप्रतिनिधींना भेटून चर्चा केली. त्यांना लेखी निवेदनही दिले. मात्र शासनाचे सदर कर्ज वाटपासाठी अनुदान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे कर्ज मंजूर झालेले बेरोजगार नैराश्यात सापडले आहेत.- काशिनाथ देवगडे, कार्यकर्ता, मादगी समाज संघटना गडचिरोली