शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या रिक्त पदांच्या भरतीला हिरवी झेंडी नाही

By admin | Updated: February 9, 2016 01:09 IST

राज्य शासनाने गडचिरोलीसह राज्याच्या सर्वच जिल्ह्यात पोलीस प्रशासनातील विविध विभागात पद भरती प्रक्रिया हाती घेतली आहे.

प्रस्ताव मंजुरीसाठी पडून : पदसंख्या वाढण्याची शक्यतागडचिरोली : राज्य शासनाने गडचिरोलीसह राज्याच्या सर्वच जिल्ह्यात पोलीस प्रशासनातील विविध विभागात पद भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. त्याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ८२ जागांसाठी पोलीस शिपाई पदाची भरती होणार आहे. मात्र जिल्ह्यात पोलिसांच्या १६३ जागा रिक्त आहे. मात्र या जागांवरही पदभरती करण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव स्थानिक पोलीस प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्याप हिरवी झेंडी मिळालेली नाही. त्यामुळे या जागांच्या पदभरतीबाबत हालचाली थंड आहेत. या जागांना मान्यता मिळाल्यास नव्या ८२ व रिक्त असलेल्या १६३ अशा २४५ जागांची पदभरती घ्यावी लागणार आहे. विद्यमान ८२ जागांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ३९, अनुसूचित जातीसाठी सहा, अनुसूचित जमातीसाठी २०, इतर मागासवर्गीयांसाठी पाच, वि.ज. अ. मधून एक, वि.ज.ब. मधून दोन, भ.ज.क. मधून दोन, विमाप्रमधून एक, जागा भरली जाणार आहे. विविध पोलीस ठाण्यात रिक्त असलेल्या १६३ जागा भरण्याला शासनाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने येथे १०० टक्के पोलिसांची पदे भरावीत, असे पोलीस अधीक्षकांनी शासनाला सुचविले आहे. परंतु १०० टक्के पदभरतीबाबत अद्याप शासनाने सिग्नल न दिल्यामुळे ही भरती रखडलेली आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही काही माध्यमांशी बोलताना बाबीला दुजोरा दिला आहे. शासनाकडे १०० टक्के पदभरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)