शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ठरलेल्या मेन्यूनुसार आहार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:39 IST

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या खरपुंडी येथील जि.प. शाळेला विद्यार्थ्यांना व्हायरल फ्लूरची लागण झाल्याने उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देजि.प. सदस्यांच्या भेटीत उघड : मेश्राम यांनी दिली खरपुंडी जि.प. शाळेला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या खरपुंडी येथील जि.प. शाळेला विद्यार्थ्यांना व्हायरल फ्लूरची लागण झाल्याने उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २६ जानेवारीला या विद्यार्थ्यांची सुटी करण्यात आली. या प्रकरणाची दखल घेत जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम यांनी खरपुंडी शाळेला भेट देऊन तेथील वस्तू स्थिती जाणून घेतली.शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाने ठरविलेल्या मेन्यूनुसार विद्यार्थ्यांना आहार देणे आवश्यक आहे. मात्र खरपुंडी शाळेत मेन्यूनुसार आहार दिला जात नसून पुरवठ्याअभावी आहारामध्ये नियमितता राहत नाही, हे दिसून आले. शालेय पोषण आहार प्रत्येक महिन्याला शाळेत पोहोचायला पाहिजे. मात्र दोन महिन्याचा आहार एकाच वेळी शाळेला पुरविला जात असल्याचेही अ‍ॅड. मेश्राम यांच्या भेटीत दिसून आले.या सर्व बाबीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. मेश्राम यांनी केली आहे. भेटीदरम्यान कुणाल पेंदोरकर, उपसरपंच कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, मुख्याध्यापिका ए. आर. लांजेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम मोहुर्ले, अरूण नैताम, रमेश नैताम आदी हजर होते.