शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

पोलिसांकडून कारवाई नाही

By admin | Updated: July 14, 2014 23:59 IST

६ जुलै रोजी नाजुकराव सेलोटे व त्यांचा मुलगा विलास सेलोटे यांनी आपल्यासोबत काही लोकांना घेऊन माझ्या घरावर बळजबरीने हल्ला केला. अंगणात ठेवलेली तणस, गिट्टी, रेती, मुरूम व तारेचे

घरावर हल्ला प्रकरण : सुकरू गौरकार यांची पत्रपरिषदेत माहितीगडचिरोली : ६ जुलै रोजी नाजुकराव सेलोटे व त्यांचा मुलगा विलास सेलोटे यांनी आपल्यासोबत काही लोकांना घेऊन माझ्या घरावर बळजबरीने हल्ला केला. अंगणात ठेवलेली तणस, गिट्टी, रेती, मुरूम व तारेचे कुंपन व शौचालयाची नासधूस केली. जागेवर ताबा मिळविण्यासाठी त्यांनी आपल्यावर दबाव आणला. याबाबतची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात त्याच दिवशी केली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी संबंधित हल्ला करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही, अशी माहिती सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सुकरू गौरकार यांनी दिली.या प्रकरणाबाबत माहिती देताना सुकरू गौरकार म्हणाले, आपण गेल्या ३५ ते ४० वर्षापासून कुरंझा (देशपूर) या गावी भूमापन क्रमांक ४५ च्या जागेवर स्वत:च्या राहत्या घरी वास्तव्य करीत आहे. ६ जुलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावातीलच नाजुकराव सेलोटे व त्यांचा मुलगा विलास सेलोटे हे अन्य सहाजणांसोबत घराकडे आले. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, सब्बल, पावडे व लाट्या-काट्या होत्या. माझ्या जागेवर राहत आहे, असे म्हणत त्यांनी घरासमोर अंगणात ठेवलेले तणीस, गिट्टी, रेती, मुरूम आदी साहित्य काढून टाकले. तसेच तारेचे कुंपन व शौचालयाची नासधूस केली. अंगणाच्या २० बाय ३० फुटाच्या जागेवर ट्रॅक्टरने खोदून खड्डा केला. या घटनेमुळे माझे संपूर्ण कुटुंबिय भयभित झाले आहे. हल्ला करणाऱ्यांकडून आम्हाला धमक्या मिळत आहेत. या घटनेची तक्रार करूनही गडचिरोली पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. माझ्यावर हल्ला करणाऱ्या सेलोटे कुटुंबिय व त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुकरू गौरकार यांनी केली.