शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता केवळ ६४२ क्रियाशिल रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

  लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. ...

ठळक मुद्दे९३ कोरोनामुक्त, तर ३८ नवीन बाधितांची भर; एकूण रूग्णसंख्या झाली ६ हजार ७३३

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधितांची संख्या घटत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. गुरूवारी (दि.१२) कोरोनाच्या ३८ नवीन रुग्णांची भर पडली तर ९३ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे क्रियाशिल रुग्णांची संख्या घटून ती आता ६४२ वर आली आहे.  आतापर्यंत एकूण बाधित ६७३३ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६०२४ वर पोहोचली आहे. एकूण ६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४७ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ९.५४ टक्के तर मृत्यूदर १ टक्के झाला आहे.मागील दाेन दिवसांपासून काेराेनाच्या रूग्णांमध्ये घट हाेत चालली आहे. त्यामुळे काेराेनाची लाट ओसरत असावी, असा अंदाज आराेग्य विभागामार्फत व्यक्त केला जात आहे. त्यातच आता दिवाळी असल्याने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१९९ रुग्ण गृह विलगिकरणातजिल्ह्यात सध्या क्रियाशिल असणाऱ्या ६४२ कोरोनाबाधितांपैकी १९९ जण स्वत:च्या घरीच गृह विलगीकरणात आहेत तर ४४३ जण ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. दिवाळीत आपल्या घरी जाण्याची इच्छा अनेक क्रियाशिल रुग्णांची असली तरी ज्यांना रुग्णालयात किमान ७ दिवस पूर्ण झाले त्यांनाच सुटी दिली जात आहे. दरम्यान क्रियाशिल रुग्णांचे प्रमाण घटल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताणही कमी झाल्याचे दिसून येते.

असे आहेत नवीन बाधित रुग्णनवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर ४, स्नेहनगर ३, हनुमान वार्ड १, हिरापूर १, अडपल्ली १, रेड्डी गोडाऊन १, आशीर्वाद नगर १, सोनापूर कॉम्प्लेक्स १, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया १, पोर्ला १, फुले वार्ड १, कन्नमवार नगर १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २,  आलापल्ली १, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक ४, वडधा १,  डोंगरगाव १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये धोडराज २, चामोर्शी तालुक्यातील आष्टी १, स्थानिक १, क्रिष्णनगर १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये ग्रामीण रुग्णालयातील १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक २, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये  खुदीरामपल्ली १, तसेच वडसा तालुक्यातील शंकरपूरचे २ जण असा समावेश आहे.

नवीन ३८ बाधितांमध्ये सर्वाधिक १७ गडचिरोली तालुक्यातील आहेत. तसेच अहेरी तालुका ३, आरमोरी ६, भामरागड २, चामोर्शी ३, धानोरा १, एटापल्ली २, मुलचेरा २ आणि देसाईगंज येथील २ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या ९३ रूग्णांमध्ये गडचिरोली २८, अहेरी १८, आरमोरी ३, भामरागड ९, चामोर्शी ६, धानोरा ४, एटापल्ली २, मुलचेरा ४, सिरोंचा २ कोरची ४,  कुरखेडा ५ आणि देसाईगंजमधील ८ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या