शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेकडील विद्यार्थ्यांसाठी अहेरीत हाेणार विद्यापीठाचे विद्यार्थी सुविधा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

विद्यापीठाला २०० एकर जागा मिळाल्याबाबत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. दुपारच्या सत्रात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दुधपचारे  यांनी २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर सभागृहाने अर्थसंकल्पास मंजुरी दिली. गोंडवाना विद्यापीठ आणि  संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व म्हणून दरवर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम राबविण्यासंदर्भात प्रस्ताव होता. त्यावर सकारात्मक चर्चा झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी सुविधा केंद्र अहेरी येथे सुरू करण्याच्या प्रस्तावाला विद्यापीठाच्या अर्थसंकल्पिय अधिसभेत सोमवारी मान्यता देण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही सभा चालली. यात ५३.४८ कोटींचा अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. योगेश्वर दुधपचारे यांनी सादर केला. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीत सदस्यांनी तो मंजूर केला.यावेळी विद्यापीठाला २०० एकर जागा मिळाल्याबाबत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. दुपारच्या सत्रात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दुधपचारे  यांनी २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर सभागृहाने अर्थसंकल्पास मंजुरी दिली.गोंडवाना विद्यापीठ आणि  संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व म्हणून दरवर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम राबविण्यासंदर्भात प्रस्ताव होता. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढण्याबाबतच्या प्रस्तावाला कुलगुरूंनी मान्यता दिली.व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित होते. संचालन अधिसभा सदस्य सचिव डॉ. अनिल चिताडे यांनी केले.

कुलगुरूंनी सांगितले काँक्रिटीकरणाचे दुष्परिणाम

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, सर्वत्र होत असलेले काँक्रिटीकरण आणि त्यामुळे पावसाच्या पाण्याची होणारी नासाडी, त्यामुळे पाणीटंचाई सारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणी अडवा-पाणी जिरवा हा उपक्रम आपण राबवत आहोत आणि त्यामुळे पाणी जमिनीत मुरेल. राष्ट्रीय सेवा  योजना विद्यार्थ्यांकडून  नदीतली माती आपण उपसून घेणार आहोत. त्यामुळे पाणी जमिनीत मुरेल आणि त्याचा फायदा नद्या, विहिरी,  बोअरवेल्स यांची पातळी वाढेल, असे सांगत रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली.

गोंडी, माडिया भाषा विभाग सुरू होणारगोंडवाना विद्यापीठात गोंडी, माडिया व इतर जनजातीय भाषा विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव होता. त्या प्रस्तावाला मान्यता देताना कुलगुरू म्हणाले, गोंडी आणि माडिया  भाषेला स्वतःची लिपी आहे. भाषाशास्त्र विषयांमध्ये गोंडी आणि माडिया भाषा सुरू केल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.

राष्ट्रसंत आणि शिवाजी महाराज केंद्रगोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत मागणी होती. या बैठकीत त्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. त्यामुळे लवकरच यासंदर्भातील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :universityविद्यापीठ