शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील सोमनपल्लीचा नवनिर्मित पूल ठरला कुचकामी; पहिल्याच पावसाळ्यात पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 16:31 IST

अयोग्य पद्धतीचे बांधकाम

कौसर खान

सिरोंचा (गडचिरोली) : तेलंगणापासून सुरू होणाऱ्या आणि छत्तीसगडमध्ये संपणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ मध्ये तीन राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. पण, या महामार्गावर सोमनपल्ली नाल्यावर उभारण्यात आलेला पूल पावसाळ्यात कुचकामी ठरत आहे. अयोग्य पद्धतीने करण्यात आलेल्या बांधकामावर मार्गावर पाणी साचून वाहतूक खोळंबते. या अयोग्य पद्धतीच्या बांधकामाची पावसाने पोलखोल केली असताना आता त्यात योग्य दुरूस्ती केली जाणार का?, असा प्रश्न कायम आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ हा सिरोंचा तालुक्यात ५६ किलोमीटरचा आहे. याची सुरुवात तेलंगणाच्या निजामाबादपासून होते. तो सिरोंचा तालुक्यातून पुढे छत्तीसगडच्या जगदलपूरपर्यंत जातो. तीन राज्यांना जोडणारा हा महामार्ग म्हणजे सुवर्णरेखाच आहे. पण, या मार्गात सिरोंचा तालुक्यात असलेला सोमनपल्ली नाला मोठा अडसर ठरला होता. सदर पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा नवीन सुधारित आराखडा तयार करून पुन्हा योग्य पद्धतीने रस्त्याचे बांधकाम केले नाही तर हा पूल आणि रस्ता पावसाळ्यात कुचकामी ठरणार आहे.

प्रगत राज्यात अप्रगत तंत्रज्ञान?

तेलंगणा आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य महाराष्ट्राच्या तुलनेत बरेच नवीन आणि अप्रगत मानले जातात. मात्र या महामार्गावरून प्रवास करणारे लोक तीनही राज्यांची तुलना करतात. हे करताना अशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गावर तेलंगणा किंवा छत्तीसगडमध्ये कुठेही अडथळा नाही, पण प्रगत म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील तंत्रज्ञान अप्रगत आहे का?, येथील अभियंत्यांचे ज्ञान कमकुवत आहे का?, असे प्रश्न प्रवासी करतात. कोट्यवधी रुपये खर्च करूनही महामार्गाच्या या दुरवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी भावना व्यक्त होत आहे.

चुकीच्या कामामुळे रस्त्यावर साचते पाणी

सिरोंचा या तालुका मुख्यालयापासून ४० कि.मी. अंतरावर असलेल्या सोमनपल्ली गावाजवळील नाल्यावर हा पूल बांधून जेमतेम एक वर्षही झालेले नाही. या पुलामुळे आता पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत सुरू राहील असे वाटले असताना पहिल्याच पावसाने चुकीच्या बांधकामाची पोलखोल केली. रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे बऱ्याच वेळा वाहतूक खोळंबून राहात आहे. या चुकीची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकgadchiroli-acगडचिरोली