शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

फेरीवाल्यांचे साेंग घेऊन आलेल्या शिकारी टाेळीचा वाघांवर डाेळा? वन विभागाच्या जागेवरच मुक्काम ठाेकून रचत हाेते कट

By गेापाल लाजुरकर | Updated: July 24, 2023 19:53 IST

वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युराेने देशभरातील व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारीची शक्यता वर्तवली हाेती.

गडचिराेली : वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युराेने देशभरातील व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारीची शक्यता वर्तवली हाेती. त्यांचा हा अंदाज अगदी तंताेतत खरा ठरत असतानाच गडचिराेली जिल्ह्यातही वाघांच्या शिकारीचा आसाममधून आलेल्या एका भटक्या जमातीतील १६ सदस्यांना वन विभागाने २३ जुलैच्या मध्यरात्री तालुक्याच्या आंबेशिवणी येथून ताब्यात घेतले. परंतु ही जमात आंबेशिवणी येथे पर्स, बॅग व भांडी विकणाऱ्या फेरीवाल्यांचे साेंग घेऊन वावरत हाेते. गडचिराेली वनवृत्तातील वाघांच्या शिकारीवर त्यांचा डाेळा हाेता काय, की त्यांनी वाघांची शिकार केली, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

वन विभागाच्या जागेवरच झाेपड्या थाटून येथे वाघांच्या शिकारीचे षड् यंत्र रचताना वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी लक्ष का दिले नाही. तसेच गावात बाहेरून येणाऱ्या फेऱ्यावाल्या किंवा भटक्या जमातीच्या लाेकांची खातरजमा जबाबदार लाेकांनी का केली नाही, असा प्रश्न आहे.

वनवृत्तातील वाघ सुरक्षित आहेत काय?गडचिराेली व वडसा वन विभागात गडचिराेली तालुक्यातील जंगलाचा समावेश हाेताे. आंबेशिवणी, दिभना, जेप्रा परिसराच्या जंगलात ६, तर वडसा वन विभागात २१ वाघांचा वावर आहे. गडचिराेली तालुक्यात जी-१, जी-१०, एसएएम-८२, जी-१६ आदी नर वाघांचा, तर जी २ व जी-५, टी- ६ आदी मादी वाघांचा समावेश आहे. गुरवळा नेचर सफारीत जी- १० ही वाघीणसुद्धा आपल्या ४ बछड्यांसह वावरत आहेत. हे सर्व वाघ सुरक्षित तर असतील ना, असा प्रश्नसुद्धा आहे. वनविभागाने ह्या वाघांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.  लाेकांचा आराेप, शेळ्या दडविल्या का ?आंबेशिवणी येथे पटाच्या जागेवर फेरीवाल्यांचे साेंग घेऊन काही दिवस मुक्काम केलेल्या त्या भटक्या जमातीच्या लाेकांकडे दाेन शेळ्या हाेत्या. परंतु ह्या शेळ्या वन विभागाने हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये दाखविल्या नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवरच गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. बॅगा भरून साडेपाच लाख हाेते का?शिकार करणाऱ्या भटक्या जमातीतील लाेकांकडे त्यांच्या ठिय्यास्थळी ५ लाख ५५ हजार रुपये विविध ठिकाणी हाेते. यापैकी काही रक्कम बॅगेत भरून हाेती तर काही रक्कम जमिनीत गाडून हाेती, असा आराेप आंबेशिवणीचे उपसरपंच याेगेश कुडवे व तंमुस अध्यक्ष माेहन पाल यांनी केला. रक्कम हस्तगत केली तेव्हा स्थानिक सरपंच, पाेलिस पाटील यांना पंचनामा करण्यासाठी का बाेलावले नाही, असेही कुडवे म्हणाले.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीTigerवाघforest departmentवनविभाग