शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डाेक्यावर जखमा; पाय माेडलेला; आलापल्लीत आढळला युवकाचा मृतदेह

By गेापाल लाजुरकर | Updated: October 29, 2023 15:26 IST

राकेश फुलचंद कन्नाके (३५) वाॅर्ड क्रमांक १, श्रमिकनगरआलापल्ली असे मृत युवकाचे नाव आहे.

गडचिराेली : चारही बाजूंनी घरे, मध्यभागी माेकळी जागा. हा परिसर नेहमी गजबजलेला; पण याच परिसरात एक युवक मृतावस्थेत आढळला. ही घटना आलापल्ली येथील गाेंडमाेहल्ला वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये रविवार २९ ऑक्टाेबर राेजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. डाेके व अंगावरील जखमांवरून या युवकाचा खून झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

राकेश फुलचंद कन्नाके (३५) वाॅर्ड क्रमांक १, श्रमिकनगरआलापल्ली असे मृत युवकाचे नाव आहे. आलापल्लीच्या गोंडमोहल्ल्यात दिवंगत डाॅ. किशोर नैताम यांच्या मालकीचे खुले पटांगण आहे. याच परिसरात दिलीप तोडासे यांचे घर आहे. घराच्या बाजूला रविवारी सकाळी राकेश कन्नाके यांचा मृतदेह चिखलाने माखलेल्या स्थितीत आढळला. माहिती मिळताच राकेशची पत्नी, आई, भाऊ व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राकेशच्या कपाळाला डाव्या डोळ्यावर गंभीर खाेल जखम हाेती. तसेच चेहरा, नाकावर जखम हाेती. एक पाय माेडलेला हाेता. शिवाय अंगावर काही जखमा हाेत्या. त्यामुळे राकेशचा खूनच झाला असावा, अशी शंका वर्तवली जात आहे.

याबाबतची माहिती मिळताच पाेलिस निरीक्षक मनाेज काळबांडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. फाॅरेन्सिक टीमसुद्धा दाखल झाली. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलिस निरीक्षक संतोष मरस्कोल्हे, पोलिस अंमलदार संजय चव्हाण, पोलिस हवालदार किशोर बांबोळे आदींनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेत उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.विविध शंकांना फुटले पेव

मृत राकेश हा वाॅर्ड क्रमांक १ श्रमिकनगर येथे राहत होता. परंतु त्याचा मृतदेह वाॅर्ड नंबर ४ मध्ये आढळून आला. ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह आढळला ती जागा ओलसर आहे; पण अंगाला चिखल माखेल एवढी दलदलीची नाही. तरीसुद्धा त्याच्या अंगाला चिखल माखला हाेता. त्यामुळे त्याचा खून घटनास्थळी झाला नसावा. चिखल परिसरातच त्याला मारून माेकळ्या जागेत आणले असावे.रात्री जेवण करून निघाला; पण कायमचाच...

राकेश हा शनिवारी रात्री घरी जेवण करून ९ वाजताच्या सुमारास बाहेर पडला. त्यानंतर ताे घरी परत आला नाही. कुटुंबातील सदस्य घरी त्याची वाट पाहत हाेते; परंतु दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच आढळून आल्याने धक्काच बसला. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून राकेशचे घर १ किमी अंतरावर आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली