शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

गणेशनच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा

By admin | Updated: September 15, 2014 00:07 IST

गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या विरोधाला झुगारून कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय अभियंता

गडचिरोली : गट्टा मार्गावरील आलदंडी नदीच्या पुलाचे काम सुरू असतांना बांधकामाला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता. या विरोधाला झुगारून कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय अभियंता एम. गणेशन यांनी या पूलाचे काम पूर्ण केले. नक्षलवाद्यांनी त्यानंतर त्यांची हत्या केली. गणेशन यांनी बीआरओच्या मार्फत काम करीत असताना या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या प्राणाची आहूती दिली. आज त्यांच्या बलिदानामुळे एटापल्ली तालुक्यातील अनेक गाव कायमस्वरूपी रस्त्याने जोडली गेली. त्यांच्या या कर्तृत्वाला गडचिरोली जिल्ह्यातील जनता कायम सलाम करीत राहिल. कर्नाटक राज्याचे रहिवासी असलेले (३६) वर्षीय एम. गणेशन यांनी नक्षलवाद्यांच्या या विरोधाला न जुमानता आलदंडी नदीवरील पुलाचे अर्धवट बांधकाम पूर्ण केले. अडंगे व जांभीयागट्टा या दोन पुलाचेही काम त्यांनी त्याचवर्षी पूर्ण केले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांची १४ जानेवारी २००६ ला निर्घृण हत्या केली. २६ जानेवारी २००७ ला गणेशनची पत्नी राखी हिला शौर्य चक्र देऊन राष्ट्रपतींनी सन्मानित केले. गणेशन यांचे बलिदान तालुक्याच्या विकासासाठी झाले. मात्र त्यांच्या शौर्यामुळे व चिकाटीमुळे गट्टा ते एटापल्ली हा ३६ किमीचा मार्ग पूर्ण झाला व दोन गावे कायमस्वरूपी एकमेकांशी जोडल्या गेली. गणेशन यांचे नाव एटापल्ली तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. त्यानंतर २००८-०९ मध्ये जिल्ह्यात निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लोकयात्रेने गणेशन यांच्या कुटुंबाची दखल घेऊन त्यांच्या पत्नीचा यात्रा समारोपप्रसंगी सत्कारही केला होता. शासनानेसुद्धा आलदंडी पुलाजवळ अभियंता गणेशन यांचे स्मारक बांधून या पुलाला या शहिदाचे नाव द्यावे, अशी भावना या तालुक्यातील जनतेचीही होती. या पूलावरून वाहतूक सुरू होऊन बरेच वर्ष लोटले. बीआरओनेही गडचिरोली जिल्ह्यातून २०१० मध्ये गाशा गुंडाळला. त्यांच्यामुळे नक्षलग्रस्त व संवेदनशील भागात रस्ते व पूल होऊ शकले. त्यानंतर या भागात विकासाचे काम मंदावले. या पूलाला गणेशनचे नाव दिले जाईल, अशी घोषणाही करण्यात आली होती. परंतु ७ वर्षाचा कालावधी लोटला. सरकारला या गोष्टीचा विसर पडला आहे. १४ जानेवारीला गणेशन यांच्या हत्येला ८ वर्ष पूर्ण झालेत. या पूलामुळे शेकडो गाव जोडल्या गेली. केंद्र सरकारने गणेशनच्या कार्याची दखल घेतली. परंतु महाराष्ट्र शासनाला मात्र त्यांच्या कार्याचा विसर पडला असेच दिसून येत आहे. एकूणच या अभियंत्याचे वीर मरण या जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान देऊन गेले. याशिवाय जिल्ह्यात काम करणाऱ्या अनेक खासगी कंत्राटदार अभियंत्याचीही नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली. त्यांचेही योगदान विकाासाठी मोलाचेच ठरले.