शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

तेंदूपत्ता हंगाम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथे आदिवासीबांधव मोठ्या संख्येने राहतात. आदिवासी व बिगर आदिवासी हजारो मजूर दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्त्याचे संकलन करून ते फळीवर विक्री करतात. यातून मजुरांना चांगली आर्थिक मिळकत मिळते. तेंदू हंगाम हा वार्षिक आर्थिक बजेट ठरविणारा महत्त्वाचा हंगाम आहे. तेंदूपत्ता हंगामातून मिळणाºया रकमेतून पाच ते सहा महिन्याचा मजुरांचा बजेट होत असते.

ठळक मुद्देसंचारबंदीचा परिणाम : गोंदियातील कंत्राटदार कोरचीत येणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कमी दिवसात भरपूर रोजगार देणारा व बऱ्यापैकी आर्थिक मिळकत मिळवून देणारा हंगाम म्हणून तेंदूपत्ता संकलन हंगामाकडे पाहिले जाते. दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात हा हंगाम एप्रिल महिन्यापासून सुरू होत होता. मात्र यंदा कोरोनाच्या संचारबंदीमुळे हा हंगाम लांबणीवर गेला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यामुळे यंदा गोंदिया जिल्ह्यातील तेंदू कंत्राटदार कोरची तालुक्यात येणार आहेत.गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथे आदिवासीबांधव मोठ्या संख्येने राहतात. आदिवासी व बिगर आदिवासी हजारो मजूर दरवर्षी उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्त्याचे संकलन करून ते फळीवर विक्री करतात. यातून मजुरांना चांगली आर्थिक मिळकत मिळते. तेंदू हंगाम हा वार्षिक आर्थिक बजेट ठरविणारा महत्त्वाचा हंगाम आहे. तेंदूपत्ता हंगामातून मिळणाºया रकमेतून पाच ते सहा महिन्याचा मजुरांचा बजेट होत असते. पेसा वनहक्क कायद्यान्वये वनोेपज खरेदी-विक्री करण्याचा अधिकार कोरची तालुक्यासह जिल्हाभरातील ग्रामसभांना मिळाला आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यातच कोरची येथील राजीव भवनात तेंदू लिलावाची प्रक्रिया घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव येथील एका कंपनीला कंत्राट देण्यात आला. सहा हजार प्रती गोणी तेंदू संकलन करावयाचे असून याचा दर प्रती शेकडा ६०० रुपये असा देण्यात आला आहे.ग्रामसभेमार्फत तेंंदूलिलाव प्रक्रिया झाल्यानंतर ग्रामपंचायस्तरावरील निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे ग्रामसभेला तेंदू घटकाचे करारनामे करता आले नाही. त्यानंतर कोरोनाच्या संचारबंदीमुळे तेंदूपत्ता संकलनाचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. यावर्षी देशावर कोरोनाचे संकट कोसळले. परिणामी लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे बंद पडले. जिल्हा सीमाही बंद करण्यात आल्या. तेंदूपत्ता तोडण्यासाठी दरवर्षी कोरची तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गोंदिया जिल्हा व इतर राज्याच्या गावांमधील शेकडो तेंदू मजूर कोरची तालुक्यात येतात. मात्र यंदा कोरोनाचे संकट आल्याने परराज्यातील व गोंदिया जिल्ह्यातील मजूर कोरची तालुक्यात येणार नाही.कंपनीचे मॅॅनेजर दाखलगोंदिया जिल्ह्याच्या आमगाव येथील सिमरन ट्रेडर्स कंपनीच्या मालकाने तेंदू हंगामासाठी मॅनेजर लोकांना २८ एप्रिल रोजी कोरचीत पाठविले. त्यांच्यासोबत चेकर, मुंशी, हमाल येणार होते. मात्र कोरोनामुळे मॅनेजरने या कामगारांना आणले नाही. या पदावर स्थानिक लोकांना रोजगार देण्यात येणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग