शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

मान्यतेशिवाय निविदा प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:55 IST

नगर परिषद तसेच नगर पंचायतीमध्ये कोणत्याही विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधित कामाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही निविदा प्रक्रिया बोलविण्यात आल्याचा प्रकार गडचिरोली पालिकेत घडला आहे.

ठळक मुद्देगडचिरोली पालिकेचा कारभार : नाली सफाईच्या कामासाठी तीन निविदा प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद तसेच नगर पंचायतीमध्ये कोणत्याही विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधित कामाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही निविदा प्रक्रिया बोलविण्यात आल्याचा प्रकार गडचिरोली पालिकेत घडला आहे.घनकचरा व्यवस्थापनांतर्गत गडचिरोली शहराच्या सर्व १२ प्रभागांमध्ये नाली उपसा करून उपसलेला गाळ ट्रॅक्टरने डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचविण्याच्या कामासाठीची ई-निविदा प्रक्रिया गडचिरोली पालिकेने काढली. २३ फेब्रुवारीपासून तर २ मार्चपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत होती. नाली उपसा कामासाठी पालिकेकडे तीन निविदा प्राप्त झाल्या असल्याची माहिती आहे. वर्षभरासाठी सदर कामाची एकूण किंमत १ कोटी ५५ लाख ९६ हजार ३०६ रूपये आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०१८ ला संपली. मात्र नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात न आल्याने या कंत्राटाला दोन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली होती. या संदर्भात पालिका प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात ठरावही घेतला होता. आता सदर दोन महिन्यांची मुदतवाढ २८ फेब्रुवारी २०१९ रोजी संपली आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही शहराच्या सर्व वार्डातील नाली उपसा कामाची निविदा प्रक्रिया हाती घेतली आहे. तसेच जुन्या कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे.या कामाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया करून प्रस्ताव सादर केला आहे. नाली सफाईच्या कामाला जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षीच मंजुरी मिळत असते. हे काम आरोग्याशी संबंधित असल्याने थांबविता येत नाही. याशिवाय सदर कामाच्या जुन्या कंत्राटदाराला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, न.प.गडचिरोली

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका