शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षातील सुख-समृद्धीसाठी भाविकांचे मंदिरांत साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:33 IST

जिल्ह्यात नवीन वर्षाचा जल्लोष आधुनिक पद्धतीने साजरा होत असतानाच नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांनी जिल्हाभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करून नवीन वर्षात सुख-समृद्धी लाभू दे, असे साकडे देवाला घातले.

ठळक मुद्देजिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम : यात्रांसह देवीदेवतांचे पूजन, सेमानातील हनुमान मंदिरात लोटली गर्दी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यात नवीन वर्षाचा जल्लोष आधुनिक पद्धतीने साजरा होत असतानाच नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांनी जिल्हाभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करून नवीन वर्षात सुख-समृद्धी लाभू दे, असे साकडे देवाला घातले. अनेक ठिकाणी कार्यक्रमही झाले.गडचिरोली शहराच्या नजीक असलेल्या सेमाना देवस्थानात बजरंगबलीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला. दिवसभर शहरासह परिसरातील भाविकांनी बजरंगबलीचे दर्शन घेऊन नवीन वर्षात सुख-समृद्धी लाभण्याची मागणी केली. आरमोरी नजीकच्या डोंगरीवर तसेच शहरातील माता मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर, साई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.जोगीसाखरा नजीकच्या नदीकाठावर वसलेल्या शिव मंदिरात भगवान शंकराचेही दर्शन अनेक भाविकांनी घेतले. देसाईगंजातील माता वॉर्डातील मंदिरासह आमगाव येथेही भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती.देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तीन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या अरततोंडी येथील महादेव गडावर निसर्गरम्य वातावरणाचा भाविकांनी अनुभव घेतला. सोबतच महादेवाचेही दर्शन घेतले. ऐतिहासिक गाव म्हणून ओळखल्या जाणाºया वैरागड येथील भंडारेश्वर देवस्थान, गोरजाई माता मंदिर, शिवमंदिर देवस्थानात भाविकांनी नवीन वर्षात दर्शन घेऊन नववर्षात शुभकामना केली. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया श्री क्षेत्र मार्र्कंडादेव, आमगाव महाल, आष्टी नजीकच्या शिव मंदिर येथेही भाविकांची गर्दी उसळली होती.अहेरी, भामरागड, सिरोंचात प्रवचन, यात्रा, शोभायात्राअहेरी येथील कन्यका माता मंदिरात तीन दिवसीय साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झाली. येथे बीड येथील साई कथाकार साई गोपाल देशमुख यांनी भाविकांना नवीन वर्षानिमित्त प्रवचन दिले. शिवाय येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर, संत मानवदयाल मंदिरातही भाविकांची गर्दी उसळली.भामरागड तालुक्यातील बेजूर येथे ३० डिसेंबरपासून बाबलाई माता यात्रा महोत्सवास सुरूवात झाली. हा महोत्सव चार ते पाच दिवस चालणार आहे. नवीन वर्षानिमित्त बाबलाई देवीच्या दर्शनासाठी येथेही भाविकांनी गर्दी केली होती.महाराष्टÑ- तेलंगणा सीमेलगत असलेल्या सिरोंचा येथील बालाजी मंदिरात धनुर्मास उत्सवाला प्रारंभ झाला असून महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सिरोंचा शहरातून भगवान विष्णूचे वाहन गरूड यांची शोभायात्रा बालाजी मंदिरातून काढण्यात आली. सोमवारी नववर्षानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ठिकठिकाणी अशा पद्धतीने परमेश्वराकडे साकडे घालण्यात आले.