शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारचा दुटप्पी व फोलपणा गावागावात सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:33 IST

काँग्रेस सरकारच्या काळात विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत सहज पोहोचत होता. मात्र विद्यमान भाजपप्रणित सरकारने जुन्याच योजनांचे नाव बदलवून अनेक योजनांचे नविनीकरण केले.

ठळक मुद्दे नामदेव उसेंडी यांचे आवाहन : काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेस सरकारच्या काळात विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत सहज पोहोचत होता. मात्र विद्यमान भाजपप्रणित सरकारने जुन्याच योजनांचे नाव बदलवून अनेक योजनांचे नविनीकरण केले. यात जाचक अटी व निकष समाविष्ट केले. त्यामुळे मागासवर्गीय लोकांना मिळणाºया सवलती बंद झाल्या. भाजपच्या सत्ताधारी पुढाºयांनी निवडणुकीपूर्वी अनेक मोठमोठी आश्वासने जनतेला दिली. मात्र तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा पत्ता नाही. केवळ दिखावूपणा सुरू आहे. भाजपचा हा दुटप्पी व फोलपणा आता गावागावात सांगण्याची गरज आहे. हे काम काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.गडचिरोली तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी येथील सभागृहात पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी मंचावर प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव कोवासे, जि.प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा महासचिव समशेर खॉ. पठाण, पंकज गुड्डेवार, पांडुरंग घोटेकर, युकाँचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रभाकर वासेकर, सी. बी. आवळे, नेताजी गावतुरे, पी. टी. मसराम, समया पसुला, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, आशिष कन्नमवार, लहुकुमार टिपले, पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, पं.स. सदस्य मालता मडावी, शंकरराव सालोटकर, आशा मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. उसेंडी म्हणाले, काँग्रेसने एससी, एसटी, एनटी, ओबीसीसह बहुजन व मागासवर्गीयांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता विद्यमान सरकारने मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या लाभाला रोख लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जाती-जाती व समाजात भेदभावाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. भाजप सरकारची नोटबंदी पूर्णत: फसली असून याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास झाला. शाळांमध्ये राबविण्यात येणाºया मोफत गणवेश योजनेत जाचक अटी घातल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. योजना द्यायच्या मात्र त्यात जाचक निकष टाकून प्रक्रिया गुंतागुंतीची करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम विद्यमान सरकार करीत आहे. त्यामुळे या सरकारवरील जनतेचा विश्वास आता उडाला आहे, असेही डॉ. उसेंडी यावेळी म्हणाले. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या हिताची काँग्रेस पुढे येणे आवश्यक आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांचा व सरकारचा दुटप्पीपणा जनतेपुढे मांडावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी खा.मारोतराव कोवासे यांनीही मार्गदर्शन केले. जि.प. सदस्य अ‍ॅड. रामभाऊ मेश्राम, नगरसेवक सतीश विधाते यांनी काँग्रेस पक्ष संघटनेबाबत महत्त्वाच्या सूचना करून भाजप सरकारच्या धोरणावर जोरदार टिका केली. प्रास्ताविक शंकरराव सालोटकर, संचालन एजाज शेख यांनी केले.पारित झालेले ठरावयावेळी जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे विविध महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून शेतकºयांना प्रती एकरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, खनिज संपत्तीवर प्रक्रिया उद्योग निर्माण करावेत, विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्पांना निधी देऊन हे प्रकल्प मार्गी लावावे, आदींचा समावेश आहे.