शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलवर मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 21:58 IST

शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी आरमोरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन .....

ठळक मुद्देबीआरएसपीचे नेतृत्व : शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या समस्या सोडवा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने शुक्रवारी आरमोरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व बीआरएसपीचे विदर्भ महासचिव राजू झोडे, प्रा. संजय मंगर यांनी केले. दुपारी जुन्या बसथांब्याजवळील तथागत बुद्ध विहारापासून मोर्चाला सुरूवात होऊन शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. शासनाच्या सर्व योजना अपयशी झाल्या असून जनतेमध्ये शासनाप्रति तीव्र नाराजी आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून सहा महिन्यांचा कालावधी उलटत आहे. परंतु शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. शासनाने ६५ वर्षावरील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना मासिक पाच हजार रूपये पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसह शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, कोणत्याही शेतकºयांच्या जमिनी बळजबरीने शासनाने संपादन करू नये, शेतमालाच्या किमती ठरविण्याचा अधिकार शेतकºयांना मिळावा, याकरिता शेतकरी लवादाची निर्मिती करावी, कर्जमाफी झालेल्या शेतकºयांची यादी तत्काळ जाहीर करून बँकेच्या मुख्य फलकावर लावावी, मच्छिमार सोसायट्यांना जिल्हा परिषद अंतर्गत लिजवर तलाव द्यावे, ग्रा. पं. द्वारा ठेका पद्धती बंद करण्यात यावी, मच्छिमार सोसायट्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, आदी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. मोर्चात शेकडो शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले. याप्रसंगी श्रावण भानारकर, विलास कोडापे, डॉ. कैलास नगराळे, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, देवानंद बाविस्कर, क्षीरसागर शेंडे, सचिन गेडाम, प्रवीण डांगे, सुमित खोब्रागडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.