शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

तहसीलवर मोर्चा धडकला

By admin | Updated: December 30, 2015 01:57 IST

भामरागड तालुक्याच्या धोडराज येथील शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, ....

निवेदन सादर : शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्याभामरागड : भामरागड तालुक्याच्या धोडराज येथील शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसह तालुका विकासाच्या विविध मागण्यांसाठी सर्व पक्षांच्या वतीने मंगळवारी काढण्यात आलेला विशाल मोर्चा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भामरागड तहसील कार्यालयावर धडकला. सदर मोर्चा येथील भामरागड नदीवरून तहसील कार्यालयाकडे काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे भामरागड तालुकाध्यक्ष मादी केसा आत्राम, मनसेचे अध्यक्ष दिनेश मडावी, पं. स. सभापती रंजना उईके, राकाँचे तालुकाध्यक्ष श्रीकांत मोडक, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिश्वास, भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे आदींनी केले. या आंदोलनात भामरागडचे माजी सरपंच खुशाल मडावी, डॉ. भारती बोगामी, न. पं. उपाध्यक्ष शारदा कंबगौणीवर, माजी पं. स. उपसभापती लालसू आत्राम, नगर पंचायतीचे बांधकाम सभापती हरीभाऊ रालेपल्लीवार, काँग्रेसचे पदाधिकारी आसिफ सोफी, लक्ष्मीकांत बोगामी, राजू कुडसामी, वामन उईके, रमेश बोलमपल्लीवार, रामजी पुंगाटी, लालसू पुंगाटी, रमेश पुंगाटी, झोरू पुंगाटी, जाफर सुफी, भारती इष्टाम, जैबून निशा सुफी, अर्पणा सडमेक, विजय कुडयामी, इंदरशहा मडावी, अ‍ॅड. लालसू नरोटे, रामशहा मडावी, शत्रू मडावी, राजू पुडके, गिरीजा हलामी, जाकीर सय्यद हुसैन, दिनेश परसा, व्यंकटेश इष्टाम आदींसह नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, महिला बचतगट, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे पदाधिकारी, आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, आश्रमशाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रतिनिधी आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते. भामरागडच्या तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)या आहेत मागण्याभामरागड तालुक्यातील धोडराज येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा देण्यात यावी, प्रत्येक पोलीस ठाण्याला महिला समिती गठित करण्यात यावी, प्रत्येक शाळेच्या वसतिगृहाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक ठेवण्यात यावे, शालेय परिसरामध्ये शासकीय काम वगळता कोणतेही सार्वजनीक कार्यक्रम घेऊ नये, भामरागड तालुक्यात अवैधरीत्या दारूविक्रेत्यांवर बंदी घालण्यात यावी, प्रत्येक शाळांमध्ये पाण्याची व स्वच्छतागृहाची बांधणी करण्यात यावी, रिक्त असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, भामरागड येथील अभयारण्य आॅफीसच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, भामरागड तालुक्यातील सर्व विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यात यावी, बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर सिंचनाची सोय करण्यात यावी, आलापल्ली ते भामरागड - लाहेरीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करावी, ताडगाव ते मन्नेराजाराम रस्त्याची दुरूस्ती करावी, भामरागड तालुक्यातील डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात यावी, आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप, आॅईल इंजिन, सोलर पंपचे वाटप करण्यात यावे, खावटी कर्ज माफ करण्यात यावे, भामरागड तालुक्यात दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांच्या धानाला ३ हजार ५०० रुपय हमी भाव देण्यात यावे आदीसह निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे.