शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहासह नातेवाईक तहसील कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:55 IST

डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यूू झाला असल्याचा आरोप करून दोषी डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेहासह नातेवाईकांनी गुरूवारी तहसील कार्यालय गाठले.

ठळक मुद्देकोरचीतील घटना : उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यूू झाला असल्याचा आरोप करून दोषी डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेहासह नातेवाईकांनी गुरूवारी तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयात काही वेळ ठिय्या मांडल्याने चांगलाच गोंधळ उडाला. मात्र तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मृतदेह उचलण्यात आला.कोरची येथूून १२ किमी अंतरावर असलेल्या नांदळी येथील धनकुमार अंकालूू उंदीरवाडे (४१) या इसमाला गुरूवारी रात्री २ वाजताच्या सुमारास विषारी साप चावला. त्याला गुरूवारी सकाळीच ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉ. कावडकर यांनी रुग्णाची तपासणी केली. तेव्हा साप चावल्याचे लक्षण दिसले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर सामान्य रुग्णाप्रमाणे औषधोपचार केला. दुपारी १२ वाजता रुग्णाची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. कोरची रुग्णालयातील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नादुरूस्त असल्याने खासगी दवाखान्याचे वाहन बोलविण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालयातील दोन्ही वाहनचालकांनी सदर वाहन चालविण्यास नकार दिला. शेवटी शासकीय वाहनातूनच रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी नेले जात होते. मात्र वाटेतच धनकुमार उंदीरवाडे यांचा मृत्यू झाला. वाहन उपलब्ध होण्यासाठी पाच तासांचा उशीर झाला. वेळेवर उपचार न झाल्याने धनकुमार यांचा मृत्यू झाला असून यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मृतदेह तहसील कार्यालयात नेण्यात आला. तहसीलदार पुष्पलता कुमरे यांनी शासनाकडून मिळणाºया सर्व योजनांचा लाभ कुटुंबाला दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह घरी नेण्यात आला.याबाबत डॉक्टर सचिन कावडकर यांना विचारणा केली असता, विषारी सापाचे लक्षण दिसत नव्हते. त्यामुळे आपण सामान्य रुग्णाप्रमाणे उपचार केला. रूग्णाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला असल्याचे लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.