शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची भटकंती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:48 IST

मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या संपूर्ण जिल्हाभरात अलिकडील दोन-तीन वर्षात झपाट्याने वाढली. त्यामुळे सर्व शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.

ठळक मुद्देशोधमोहीम : प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा सर्वेक्षण अहवाल सादर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या संपूर्ण जिल्हाभरात अलिकडील दोन-तीन वर्षात झपाट्याने वाढली. त्यामुळे सर्व शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात शिक्षकांकडून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू झाली आहे. जिल्हा परिषद, खासगी व्यवस्थापन व आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील शिक्षक आता ग्रामीण भागात इयत्ता पहिली व पाचवीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी फिरत आहेत.जिल्ह्याच्या १२ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजारवर मराठी माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, भामरागड, अहेरी प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित मिळून १०० च्या आसपास आश्रमशाळा आहेत. याशिवाय खासगी व्यवस्थापनाच्या शाळांची संख्या मोठी आहे. गाव तिथे शाळा झाल्याने प्रवेशपात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत दरवर्षी करावी लागते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा संबंधित वर्गाच्या प्रवेश क्षमतेइतक्या विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्यासाठी शिक्षकांची कसोटी लागणार आहे. जि.प. शाळांमधील शिक्षकांकडून इयत्ता पहिलीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण फेब्रुवारी महिन्यातच करण्यात आले. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या आकड्यांसह अहवाल केंद्र प्रमुखांमार्फत गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे पोहोचला आहे.खासगी शाळांमध्ये स्पर्धा लागणारगडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, चामोर्शी, एटापल्ली, अहेरी, आलापल्ली, आष्टीसह जिल्ह्याच्या शहरी भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या प्रचंड वाढली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमांचे कॉन्व्हेंट गेल्या काही वर्षांपासून सुरू झाले आहे. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाकडे वाढला असल्याने या शाळांना विद्यार्थी मिळतात. मात्र खासगी व्यवस्थापनाच्या मराठी शाळांमध्ये फारसे प्रवेश होत नाही. त्यामुळे शहरातील खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमधील शिक्षकांमध्ये प्रवेशपात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी यंदाही स्पर्धा होणार आहे. काही शिक्षक यावर्षीही पालकांना आमिष देऊन प्रवेश निश्चित करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार नियोजन ठरले आहे.