प्रशांत कुत्तरमारे यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय बाल व कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे धानोरात उद्घाटन धानोरा : लहानपणापासूनच खेळाविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी पहिल्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांना खेळाचे धडे द्यावे, खेळातील तंत्र त्यांना समजावून सांगावे, बहुतांश जिल्हा परिषद शाळांकडे पुरेशा प्रमाणात मैदान उपलब्ध आहे. या मैदानाचा वापर करावा, लोकसहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले. धानोरा येथील मैदानावर जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा व कला संमेलनाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुत्तरमारे बोलत होते. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट, प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, शिक्षण व क्रीडा समिती सदस्य अॅड. गजानन दुग्गा, जि. प. सदस्य मनोहर कोरेटी, अशोक इंदुरकर, केसरी उसेंडी, पद्माकर मानकर, शांताबाई परसे, सुखमा जांगधुर्वे, धानोरा पंचायत समितीच्या सभापती कल्पना वड्डे, धानोरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर, पंचायत समिती उपसभापती माया मोहुर्ले, पंचायत समिती सदस्य परसराम पदा, न. पं. उपाध्यक्ष ललीत बरच्छा, नगरसेवक सुभाष धाईत, समीर कुरेशी, विनोद मडावी, विनोद निंबोरकर, संवर्ग विकास अधिकारी सपाटे, उपशिक्षणाधिकारी मनमोहन चलाख, पं. स. गटशिक्षणाधिकारी आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी व शिक्षक यांचे सुमारे १२० संघ सहभागी झाले. यामध्ये २ हजार ५०० खेळाडूंचा समावेश आहे. खेळादरम्यान दुदैवाने एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास विद्यार्थी अपघात विमा अंतर्गत एक लाख रूपयांचा विमा काढण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट यांनी दिली. सदर स्पर्धांचा समारोप २३ डिसेंबर रोजी होणार आहे. कार्यक्रमादरम्यान एटापल्ली, धानोरा व भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माणिक साखरे, संचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार तर आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांनी शाळेत खेळाचे वातावरण तयार करावे
By admin | Updated: December 22, 2016 02:20 IST