शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धानोरातील शिक्षकांचे वेतन थकले

By admin | Updated: July 25, 2016 01:37 IST

पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन अजूनपर्यंत काढण्यात आले नाही.

धानोरा : पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन अजूनपर्यंत काढण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. जिल्हा परिषदेकडून सर्व पंचायत समित्यांना जून महिन्याचे वेतन १० दिवसांपूर्वीच पाठविण्यात आले आहे. मात्र येथील शिक्षण विभागाने शिक्षकांचे बिल लेखा विभागाला सादर केले नाही. त्यामुळे शिक्षकांना जून महिन्याच्या वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. धानोरा पंचायत समितीमध्ये मागील एक वर्षापासून शिक्षकांचे पगार बिल उशीरा सादर करणे, बिलात वारंवार चुका करणे असे प्रकार सुरू झाले आहेत. परिणामी येथील शिक्षकांचे वेतन इतर पंचायत समितीमधील शिक्षकांच्या तुलनेत नेहमी २० ते २५ दिवस उशीरा होते. त्यामुळे शिक्षकांना नेहमीच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नव्यानेच पंचायत समितीमध्ये रूजू झालेले बीडीओ सपाटे यांचे समक्ष गट शिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी १४ जुलैपर्यंत शिक्षकांची वेतन बिले सादर करण्याची हमी दिली होती. मात्र यानंतरही परिस्थितीमध्ये कोणताच फरक पडला नाही. वेतन उशीरा मिळणे ही धानोरा पंचायत समितीत नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. वेळोवेळी कर्मचाऱ्यांकडून त्याच चुका कशा पध्दतीने होतात, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेहमीच वेतन बिल सादर करण्याला उशीर होते. याचा अर्थ येथील कर्मचारी कामचुकार असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी धानोरा तालुक्यातील शिक्षकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)