शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या भेटीत शिक्षक मद्यधुंद अवस्थेत आढळला

By admin | Updated: August 11, 2016 01:31 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी बुधवारी कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत गडगडा जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली.

पोलिसात तक्रार : गडगडा जि. प. शाळेतील प्रकार कुरखेडा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी बुधवारी कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत गडगडा जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. यावेळी या शाळेत कार्यरत सहायक शिक्षक फाल्गुन गिरडकर हे मद्यधुंद अवस्थेत टेबलावर पाय ठेवून कर्तव्यावर असल्याचे दिसून आले. लागलीच मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी आपल्या सहायकाच्या मदतीने मद्यधुंद अवस्थेतील शिक्षक गिरडकर यांना थेट कुरखेडा पोलीस ठाण्यात आपल्या वाहनात बसवून नेले. सदर घटना बुधवारी दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान घडली. कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत खेडेगाव केंद्रात गडगडा येथे जिल्हा परिषदेची १ ते ४ पर्यंतची प्राथमिक शाळा असून येथे दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेतील शिक्षक गिरडकर हे मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुरखेडा पोलिसांनी कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात या शिक्षकाची वैद्यकीय तपासणी केली. यात दारू प्राशन केल्याचे निष्पन्न झाल्याने या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. गडगडा जि. प. शाळेत सदर प्रकार अधिकाऱ्यांच्या भेटीस उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. सीईओ गोयल कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)