शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

समायोजनासाठी शिक्षकांची उसळली गर्दी

By admin | Updated: March 20, 2017 01:23 IST

पदवीधर शिक्षक व विषय शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आली होती.

एक हजार शिक्षकांचे समायोजन : सोमवारीही चालणार प्रक्रिया गडचिरोली : पदवीधर शिक्षक व विषय शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आली होती. या समायोजन प्रक्रियेला जिल्हाभरातून हजारो शिक्षक उपस्थित होते. त्यामुळे जिल्हा परिषद हायस्कूलच्या परिसरात शिक्षकांची मोठी गर्दी दिसून येत होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख, सर्व तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शनिवारी मुख्याध्यापकांचे समायोजन करण्यात आले. त्यानंतर पदवीधर शिक्षक व विषय शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी राबविण्यात आली. सदर प्रक्रिया सोमवारी सुध्दा चालू राहणार आहे. उच्च शिक्षणासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेताच ज्या शिक्षकांनी शिक्षण घेतले आहे. अशा शिक्षकांचेही नावे पदवीधर शिक्षकांच्या यादीत असल्याने काही शिक्षक संघटनांनी यावर आक्षेप नोंदविला होता. सदर यादी रद्द करावी, समायोजनाची प्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. मात्र शिक्षण विभागाने समायोजनाची प्रक्रिया नियोजीत वेळेप्रमाणे व यादीप्रमाणे पुढे चालू ठेवली. जवळपास एक हजार शिक्षकांचे समायोजन केले जाणार होते. यासाठी सेवाज्येष्ठतेत एक ते हजारपर्यंतच्या शिक्षकांना बोलाविण्यात आले होते. जिल्हाभरातून हजारो शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेला उपस्थित होते. रात्री उशीरापर्यंत समायोजनाची प्रक्रिया सुरू होती. सेवाज्येष्ठतेनुसार प्रत्येक शिक्षकाला बोलावून त्याच्यासमोर रिक्त असलेल्या जागांची यादी दाखविली जात होती. त्यानंतर समायोजन केले जात होते. बंगाली माध्यमांच्या शाळांमध्ये अनेक मराठी माध्यमांचे शिक्षक कार्यरत होते. त्या शिक्षकांना काढून बंगाली माध्यमातून शिक्षण झालेल्या शिक्षकांना बंगाली माध्यमाच्या शाळेवर नेमण्यात आले. (नगर प्रतिनिधी)