शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची पाठ

By admin | Updated: September 1, 2014 23:33 IST

शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय आदर्श दिला जातो.

अनास्था : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ११ प्रस्तावगडचिरोली : शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय आदर्श दिला जातो. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राथमिक शिक्षकांचे पुरस्कारांसाठी केवळ ११ प्रस्ताव दाखल झाले आहेत. फारच कमी प्रस्ताव दाखल झाल्याने आदर्श शिक्षक पुरस्काराप्रती शिक्षकांमध्ये अनास्था असल्याचे दिसून येते. या पुरस्काराकडे अनेक लायक व पात्र शिक्षकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.भारताचे दुसरे राष्ट्रपती थोर शिक्षण तज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी शिक्षक दिनी शासन व प्रशासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांच्या कार्यांचा गौरव केला जातो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांकडून १५ जुलैपासून १ सप्टेंबरपर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव मागविण्यात आले. आज १ सप्टेंबरच्या तारखेत अखेरच्या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षकांचे केवळ ११ प्रस्ताव शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षकांकडून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकही प्रस्ताव अद्यापर्यंत शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पाच वर्षाच्या शिक्षक सेवेचा गोपनिय अहवाल, सलग १५ वर्षाची सेवा, मुख्याध्यापकांसाठी सलग २० वर्षाची सेवा व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे चारित्र्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (प्रतिनिधी)वेतनवाढ व आर्थिक लाभाच्या अभावामुळे प्रस्ताव कमीखूप वर्षापूर्वी राज्य शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच जिल्हा परिषदेकडून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगावू वेतनवाढ देण्यात येत होती. मात्र सदर वेतनवाढ बंद करण्यात आल्याने या पुरस्कारासाठी सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावामध्ये घट झाली आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना रोख स्वरूपात कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ देण्यात येत नाही. यामुळे बहुतांश शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करीत नसल्याचे दिसून येते. याशिवाय पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनाच स्वत: प्रस्ताव दाखल करावा लागतो.