शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:01 IST

राज्य शासनाच्या अन्यायकारी धोरणाचा विरोध करण्यासाठी जिल्हाभरातील हजारो शिक्षक ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत, ....

ठळक मुद्दे४ नोव्हेंबर रोजी मोर्चा : महाराष्टÑ राज्य शिक्षक समन्वय समितीचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या अन्यायकारी धोरणाचा विरोध करण्यासाठी जिल्हाभरातील हजारो शिक्षक ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत, अशी माहिती महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी दिली आहे.निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यासाठी संबंधित शिक्षकाची शाळा अ दर्जाची असावी, अशी अट २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयान्वये टाकली आहे. सदर अट अतिशय अन्यायकारक आहे. ही अट रद्द करावी. शिक्षकांवर लादलेली आॅनलाईन कामे बंद करून केंद्र पातळीवर डाडा आॅपरेटरची नेमणूक करावी. नोव्हेंबर २००५ नंतर दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. बदल्या करताना कोणावरही अन्याय होऊ नये, याची दखल घ्यावी. एमएससीआयटीसाठी मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ द्यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातील हजारो शिक्षक सहभागी होणार आहेत, अशी माहिती विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांनी दिली आहे.पत्रकार परिषदेला महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पी. ए. कावडकर, महाराष्टÑ राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे प्रभाकर साखरे, प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह प्रमोद खांडेकर, सचिव यशवंत शेंडे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आशिष धात्रक, राष्टÑवादी शिक्षक संघटनेचे विनोद ब्राह्मणवाडे उपस्थित होते. या आंदोलनाला प्राथमिक शिक्षक समिती, केंद्र प्रमुख संघटना व इतरही शिक्षक संघटनांनी पाठींबा दर्शविला असल्याची माहिती उपस्थितांनी दिली.