शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात शिक्षक जागीच ठार

By admin | Updated: December 29, 2014 23:41 IST

तालुक्यातील मोसम गावावरून आलापल्लीकडे दुचाकीने जात असताना अहेरी-सिरोंचा मार्गावरील नागमंदिराजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाल्याने दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार,

पत्नी गंभीर जखमी : टायर फुटल्याने दुचाकीची झाडाला धडकअहेरी : तालुक्यातील मोसम गावावरून आलापल्लीकडे दुचाकीने जात असताना अहेरी-सिरोंचा मार्गावरील नागमंदिराजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाल्याने दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार, तर शिक्षकाची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारला दुपारी वाजताच्या सुमारास घडली.प्रभाकर विठ्ठल कुळमेथे (४५) रा. रेशमीपूर ता. चामोर्शी असे ठार झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांची पत्नी रेखा प्रभाकर कुळमेथे ही या अपघातात गंभीर जखमी झाली. प्राप्त माहितीनुसार शिक्षक प्रभाकर कुळमेथे हे सासुरवाडीला मोसम येथे पत्नीसह दुचाकीने गेले होते. सोमवारला दुपारच्या सुमारास मोसमवरून एमएच ३३-३७३४ या दुचाकीने आलापल्लीकडे परत येत असताना अचानक दुचाकीचा टायर फुटला. त्यामुळे नागमंदिराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकी आदळली. यात शिक्षक प्रभाकर कुळमेथे हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी रेखा कुळमेथे गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अहेरी ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची नोंद घेतली. या घटनेचा पुढील तपास हडपे, उराडे करीत आहेत. २०१४ वर्षाच्या अखेरीस जिल्हाभरात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)