शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारात गुंडाळले जाताहेत तेंदू लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता लिलावाच्या तिसऱ्या फेरीत काही गावांचे लिलाव होत आहेत. मात्र या लिलावात केवळ ५ हजार ते ५ हजार ५०० प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळत असल्याने गावकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने ठेकेदार बोलेल तेवढ्या किमतीला लिलाव सोडावा लागत आहे.मागील वर्षी तेंदूपत्ता लिलावाच्या कालावधीत ...

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनेत चारपट कमी भाव : कंत्राटदारांकडून अत्यल्प प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तेंदूपत्ता लिलावाच्या तिसऱ्या फेरीत काही गावांचे लिलाव होत आहेत. मात्र या लिलावात केवळ ५ हजार ते ५ हजार ५०० प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळत असल्याने गावकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पर्याय नसल्याने ठेकेदार बोलेल तेवढ्या किमतीला लिलाव सोडावा लागत आहे.मागील वर्षी तेंदूपत्ता लिलावाच्या कालावधीत देशाच्या तेंदूपत्ता बाजारात प्रचंड तेजी होती. ही तेजी वर्षभर कायम राहिल. हा अंदाज बांधून तेंदूपत्ता कंत्राटदारांनी सुमारे १५ ते २२ हजार रूपये एवढा प्रती स्टॅन्डर्ड बॅग भाव देऊन तेंदूपत्ता खरेदी केला. मात्र तेंदूपत्ता संकलनाच्या तीन ते चार महिन्यानंतर तेंदूपत्त्याची मागणी व भाव दोन्ही कमी झाले. परिणामी मागील वर्षीचा काही तेंदूपत्ता अजुनही गोदामात पडून आहे. भावही घसरल्याने कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कंत्राटदारांनी पहिल्या दोन लिलावांमध्ये सहभागच घेतला नाही. तिसऱ्या फेरीच्या लिलावासाठी काही गावांमध्ये कंत्राटदारांनी बोली लावली. मात्र सदर बोली ५ हजार ते ५ हजार ५०० एवढ्या दरम्यानच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत केवळ २५ टक्के एवढाच भाव यावर्षी मिळाला आहे. मात्र नाईलाज असल्याने कंत्राटदार बोलेल तेवढ्याला लिलाव सोडावा लागत आहे. कोरची तालुक्यातील १०५ व धानोरा तालुक्यातील ८४ ग्रामसभांचे लिलाव झाले आहेत. या ग्रामसभांना ५ हजार ते ५ हजार ५०० दरम्यानचाच भाव मिळाला आहे. त्यामुळे इतर ग्रामसभांनाही यापेक्षा अधिक भाव मिळण्याची आशा धुसर झाली आहे.बहुतांश ग्रामसभांना लिलावाची प्रतीक्षाचकोरची व धानोरा तालुक्यातील काही ग्रामसभांच्या तेंदूपत्त्याचे लिलाव पार पडले आहेत. त्यांना कमी का होईना उत्पन्न मिळणार आहे. मात्र १५ दिवसांवर तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम आला असताना अजूनपर्यंत एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, कुरखेडा तालुक्यातील ग्रामसभांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे ग्रामसभांचे पदाधिकारी चिंतेत पडले आहेत. कंत्राटदार न मिळाल्यास लाखो रूपयांचे उत्पन्न बुडणार आहे. याचा मोठा फटका ग्रामसभांना बसणार आहे. काही ग्रामसभांचे पदाधिकारी स्वत: कंत्राटदारांशी संपर्क साधून तेंदूपत्त्याच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी निमंत्रीत करीत असल्याचे दिसून येत आहे.