शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘शौचालय असेल तरच बोला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:56 IST

शौचालय बांधकामाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हैसकर यांनी पंचायत समितीमध्ये रूजू झाल्यापासून आपल्या टेबलावर शौचालय असेल तरच बोला,...

ठळक मुद्देबांधकामाला मिळणार गती : अहेरीच्या गट विकास अधिकाºयांचा अनोखा उपक्रम

ऑनलाईन लोकमतअहेरी : शौचालय बांधकामाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हैसकर यांनी पंचायत समितीमध्ये रूजू झाल्यापासून आपल्या टेबलावर शौचालय असेल तरच बोला, अशी पाटी ठेवली आहे. सदर पाटी गट विकास अधिकाऱ्यांकडे येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिक व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.स्वच्छ भारत करण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून संबंधित कुटुंबाने त्या शौचालयाचा वापर करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाकडून शौचालय बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. तरीही ग्रामीण भागातील काही कुटुंब शौचालय बांधत नाही व बांधले तरी त्याचा वापर करीत नाही. परिणामी पंचायत समितीला शौचालय बांधकामाचे दिलेले उद्दिष्ट गाठण्यास अपयश येत आहे. ग्रामीण भागातील विविध योजनांची अंमलबजावणी पंचायत समितीच्या मार्फत केली जात असल्याने ग्रामीण भागातील शेकडो नागरिक पंचायत समितीमध्ये व गट विकास अधिकाऱ्यांकडे येतात. गट विकास अधिकाऱ्यांनी टेबलावरच शौचालय असेल तरच बोला, अशी पाटी लावली आहे. ही पाटी बघितल्याबरोबर ज्या व्यक्तीकडे शौचालय नाही. अशा व्यक्तीला शौचालय बांधण्याची आठवण होते. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचे बांधकाम करण्यास व त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित होत आहेत. गट विकास अधिकारी म्हैसकर यांनी सुरू केलेला हा अशा प्रकारचा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमांमुळे शौचालय बांधकामाची गती वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.