शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

रंगली चर्चा पालकमंत्र्यांची

By admin | Updated: November 2, 2014 22:33 IST

भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये

वजनदार मंत्री द्या : मागील पाच वर्ष आर. आर. पाटील यांनी सांभाळली धुरागडचिरोली : भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतर गडचिरोली या मागास जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याची चर्चा शहराच्या पानटपरीपासून ते गावाच्या चावडीपर्यंत रंगू लागली आहे. २००९ मध्ये ५१ पोलीस जवान शहीद झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्याकडे लादून घेतली. विधानसभेत गडचिरोलीच्या कायदा सुव्यवस्थेवर वादळी चर्चा झाल्यानंतर पाटील यांनी हा निर्णय घेतला. त्यावेळी विरोधी बाकावर असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा याबाबत खास आग्रह होता. आता मुनगंटीवार हे राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले आहे. भाजपच्या सरकारात गडचिरोली या मागास जिल्ह्याला पालकमंत्री कोण मिळतो, याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या सर्व भागात रंगत आहे. २००९ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना गडचिरोलीच्या पालकत्व पदाची जबाबदारी आर. आर. पाटील यांनी आपल्यावर लादून घेतली. गडचिरोलीच्या विकासाला चालना देण्यासाठी पाटील यांनी प्रयत्नही केलेत. परंतु या भागाचा हवा तसा विकास झाला नाही. अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहे. गडचिरोली जिल्हा हा मुंबईच्या हिशोबात अजुनही ३० ते ३५ वर्ष मागे आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच बैठकीनंतर मागास भागाच्या विकासाकडे आपले लक्ष राहिल, असे जाहीर केले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासोबतच या भागात रेल्वे, हवाईपट्टी, सिंचनाचे प्रश्न, औद्योगिक विकास तसेच पायाभूत सुविधा निर्माण करणे या कामांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी तडफदार व धडाडीचा पालकमंत्री मिळणेही आवश्यक आहे. विदर्भातील माणूस जर गडचिरोलीचा पालकमंत्री झाला तर विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास या जिल्ह्यातील जनतेला आहे. आर. आर. पाटील पालकमंत्री असताना त्यांनी जनतेपेक्षा अधिकाऱ्यांचे ऐकूण नियोजन करण्यावर भर दिला. त्यामुळे जनतेत मोठी नाराजी त्यांच्याविषयी होती. त्यांनी प्रत्येक महिन्याला गडचिरोलीला भेट देऊन आपले कर्तव्य पार पाडले. मात्र सर्वसामान्य माणसापर्यंत विकासाचे चित्र त्यांना निर्माण करता आले नाही. त्यामुळे आता नव्या सरकारच्या पालकमंत्र्यांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहे. चांगला व अभ्यासू पालकमंत्री गडचिरोलीला लाभावा, अशी आशा जनता व्यक्त करीत आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे नावही पालकमंत्री पदासाठी सर्वसामान्यांमध्ये चर्चेत आहे. त्यांनीच त्यावेळी आर. आर. पाटील यांना आव्हान देऊन पालकमंत्री पदाची धुरा घ्यायला लावली होती. मुनगंटीवार यांनी आता स्वत: जिल्ह्याचे पालकत्व घ्यावे, असा एक विचारप्रवाह आहे. मुनगंटीवार यांच्याकडे वनखाते देण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के जंगल आहे. वनखात्याच्या अडसरामुळे येथील अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पालकत्व घेतल्यास या जिल्ह्याला न्याय देणे शक्य होईल, असा मतप्रवाह नागरिकांमध्ये आहे. युतीचे सरकार असताना शिवसेनेचा मंत्री गडचिरोलीचा पालकमंत्री होता. या काळात गजानन किर्तीकर यांनी पालकमंत्री पद सांभाळले होते. आताही सेना-भाजपची युती होऊ घातली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला पालकमंत्री पद जाते काय? अशीही जनमाणसात चर्चा आहे. मात्र सध्या जिल्ह्यात तिनही आमदार भाजपचे तसेच खासदारही भाजपचेच आहे. त्यामुळे भाजपचा पालकमंत्री होईल, असा भाजपचा दावा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)