शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ आॅफिसच्या इमारतीसाठी अर्थमंत्र्यांना बोलून निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:26 IST

गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अनेक दिवसांपासून अर्धवट आहे. ८० टक्के काम झाले असले तरी २० टक्के काम निधीअभावी राहिले आहे.

ठळक मुद्देपरिवहनमंत्र्यांची ग्वाही : ‘लोकमत’ने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अनेक दिवसांपासून अर्धवट आहे. ८० टक्के काम झाले असले तरी २० टक्के काम निधीअभावी राहिले आहे. ही बाब लोकमतने निदर्शनास आणून देताच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून उर्वरित कामासाठी तत्काळ निधीची व्यवस्था करणार, अशी ग्वाही दिली.गडचिरोली दौºयावर आले असताना विश्राम भवनावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरटीओ कार्यालयाच्या अर्धवट बांधकामाबद्दलचे वृत्त शनिवारच्या अंकात लोकमतने प्रकाशित केले होते. ना.रावते यांनी ही बातमी वाचून हे इमारत बांधकाम पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा निधी मिळवून देण्याची ग्वाही दिली.रावते यांनी कर्जमाफीसंदर्भात गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या गतीमान कामावर समाधान व्यक्त केले. फक्त कर्जमाफीचा शक्य तितक्या लवकर लाभ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. आदिवासी समाजातील उमेदवारांना एसटी महामंडळात चालक म्हणून नोकरी देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, शहर अध्यक्ष रामकिरीत यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.