शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने रूजू झालेले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश भांड यांच्यासोबत तालुक्यातील शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी भांड यांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी धानोरा पंचायत समितीचे सभापती अजमन राऊत, गटशिक्षणाधिकारी रमेश उचे, शिक्षण विस्तार अधिकारी सदानंद सलाम, लेखाधिकारी शंकर कोरंटलावार, तालुकाध्यक्ष डंगाजी ...

ठळक मुद्देबीडीओंना निवेदन : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने रूजू झालेले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश भांड यांच्यासोबत तालुक्यातील शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी भांड यांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी धानोरा पंचायत समितीचे सभापती अजमन राऊत, गटशिक्षणाधिकारी रमेश उचे, शिक्षण विस्तार अधिकारी सदानंद सलाम, लेखाधिकारी शंकर कोरंटलावार, तालुकाध्यक्ष डंगाजी पेंदाम, जिल्हा सरचिटणीस रमेश रामटेके, तालुका सरचिटणीस प्रशांत काळे, गणेश काटेंगे, ओमप्रकाश सिडाम, रवींद्र घोंगडे सोमेश्वर दुर्गे, प्रकाश नागापुरे, सुभाष जांगी, नरेश गेडाम, भावेश उईके, वामन पोरेटी, मोरेश्वर अंबादे, हेमंत घोरापटीया, राजेश्वर पदा, गणेश मडावी उपस्थित होते. वरिष्ठ सहायक लिपीक मेश्राम यांना धानोरा शिक्षण विभागात कायम स्वरूपी पदस्थापना द्यावी, चटोपाध्याय, निवड वेतनश्रेणी, नियमित सेवा, स्थायी सेवा व शिक्षकांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करणे, केंद्रस्तरीय शालेय बाल कला व क्रीडा संमेलनाची निधी त्वरित आयोजकांच्या खात्यात जमा करणे, जिल्हा परिषद शाळा पेंढरी, कटेझरी नं. २ येथील शिक्षक ज्ञानेश्वर खेवले यांचे थकलेले वेतन द्यावे, रेगादंडी येथील प्राथमिक शिक्षिका एम.जे. धाईत यांचे तात्पुरते समायोजन रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर पाठवावे, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशन काळात कोणतेही प्रशिक्षण आयोजित करू नये, परीक्षांची परवानगी मिळालेल्या शिक्षकांच्या अभ्यासक्रमाची नोंद सेवापुस्तकात करावी आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना सादर केले. या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांना दिले.