शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लॅपटॉपमध्ये तलाठी नापास

By admin | Updated: December 29, 2014 23:43 IST

पेपरलेस कामकाज वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठ्यांना लॅपटॉप किंवा संगणक पुरविले़ मात्र संगणक निरक्षरतेमुळे जिल्ह्यातील ३० टक्के तलाठी संगणक,

देसाईगंज : पेपरलेस कामकाज वाढविण्याच्या दृष्टीने शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठ्यांना लॅपटॉप किंवा संगणक पुरविले़ मात्र संगणक निरक्षरतेमुळे जिल्ह्यातील ३० टक्के तलाठी संगणक, लॅपटॉप हाताळण्यात असमर्थ आहेत़ शासकीय खर्चातून मिळालेला संगणक मात्र तलाठ्यांच्या घराची शोभा वाढवित आहेत. मात्र याकडे महसूल व सबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे़सातबारा, नमुना आठ किंवा गावातील इतर बाबींची माहिती कळ दाबताच डोळ्यासमोर आली पाहिजे़ यादृष्टीने शासनाने राज्यभरातील तलाठ्यांना शासकीय खर्चातून संगणक किंवा लॅपटॉप पुरविले़ तलाठ्यांनी मोठ्या हिंमतीने लॅपटॉप आपल्या ताब्यात देखील घेतले. मात्र जिल्ह्यातील तीस टक्के तलाठ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देखील नसल्यामुळे शासकीय अनुदानातून मिळालेले लॅपटॉप तलाठ्यांच्या घरांची शोभा वाढवित आहेत.़ संगणकाचे प्राथमिक ज्ञान नसणारे तलाठी शासनाकडून घेतल्या जाणारी एमएससीआयटी ही परीक्षा मात्र उत्तीर्ण आहेत़ याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे़ अनेक तलाठ्यांनी शासकीय लॉपटॉप आपल्या पाल्यांना दिले आहेत़. देसाईगंज तालुक्यात तर केवळ दोन तलाठी संगणक हाताळून आपला कार्यभार चालवित आहेत़. तलाठ्यांच्या संगणक निरक्षरतेमुळे साधा सात-बारा उतारा हातोहाती तयार करावा लागत आहे़ मात्र याकडे महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी साधे लक्ष देण्याची तसदीसुध्दा घेतलेली नाही़ आधुनिक युगात संगणक साक्षरता अतिशय आवश्यक आहे़. दैनंदिन व्यवहारात संगणकाचे काम पडते़ त्याकरिता शासनानेदेखील कोट्यवधींचा खर्च करून तलाठ्यांना संगणक पुरविले आहेत़ दैनंदिन कामकाजातील स्टेशनरीच्या खर्चावर यामुळे आळा बसावा तसेच शासकीय कामे पेपरलेस पध्दीने जलद होण्याकरिता शासनाने ही योजना कार्यान्वीत केली होती़ संगणकाचा पुरवठा होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे़ अनेक तलाठी कार्यालयात संगणक पोहोचले आहेत. तर अनेक कार्यालयांना संगणकाची अद्यापही प्रतीक्षा आहे. तलाठी कार्यातील काम तीव्र गतीने चालावे, या उद्देशाने संगणक पुरविण्यात आले आहेत. मात्र शासकीय स्तरावर एमएससीआयटीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तलाठ्यांनी स्वत:च्या कार्यालयातून लॅपटॉपला हद्दपार केले आहे. (वार्ताहर)