शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चौघांच्या खात्यातून पाच लाख ११ हजार रूपये लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:51 IST

गडचिरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या चार ग्राहकांच्या खात्यातून ५ लाख ११ हजार रूपयांची रक्कम वळती करून त्यांना गंडविल्याची घटना मंगळवारी घडली.

ठळक मुद्देतंत्रज्ञानाचा फटका : सर्व ग्राहक भारतीय स्टेट बँकेचे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या चार ग्राहकांच्या खात्यातून ५ लाख ११ हजार रूपयांची रक्कम वळती करून त्यांना गंडविल्याची घटना मंगळवारी घडली.राजोली येथील विठ्ठल सोमाजी कुळमेथे यांच्या एसबीआयच्या बँक खात्यातून १ लाख ६० हजार रूपये, पोलीस संकूल गडचिरोली येथील सुभाष देवाजी भोयर यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार रूपये, रामपुरी वॉर्डातील प्रमोद मारोतराव पेशट्टीवार यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार रूपये व शिवाजी नगरातील जयराम भिवाजी भोयर यांच्या खात्यातून ३१ हजार रूपये अज्ञात इसमाने कोणत्याही प्रकारची माहिती न देता दुसºयाच्या खात्यात वळती केली. ज्याच्या खात्यात वळती झाली, तो इसम गुडगाव (दिल्ली) येथील आहे. याबाबतची तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय सांगळे करीत आहेत.विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच १८ आॅक्टोबर रोजी मनोहर गंगाधर चिचघरे यांच्या बँक खात्यातून १ लाख ६० हजार रूपयांची रक्कम दुसºयाच्या खात्यात वळती करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी घटना घडली आहे. विशेष म्हणजे हे सर्व खातेदार स्टेट बँक आॅफ इंडियाचे असल्याने या बँकेच्या खातेदारांमध्ये खळबळ माजली आहे. बँकेने आपल्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी फसवणूक झालेल्यांनी केली आहे.माहिती न विचारताच पैसे वळतेयापूर्वी एका बँक खात्यातून दुसºया बँक खात्यात पैसे वळते करण्यासाठी संबंधित खातेदाराच्या एटीएम कार्डचे पासवर्ड विचारले जात होते. पासवर्ड मिळाल्यानंतर रक्कम दुसºया खात्यात वळती केली जात होती. याबाबत नागरिकांमध्ये बºयाप्रमाणात जागृती झाली असल्याने नागरिक आपला एटीएम पासवर्ड देत नाही. आता मात्र संबंधित खातेदाराला कोणतीही विचारणा न करताच त्याच्या बँक खात्यातून पैसे वळते केले जात आहेत. पैसे वळते केल्याचा संदेश मोबाईलवर आल्यानंतर संबंधित व्यक्तीला आपले पैसे काढले गेले, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येते. नेमकी कशी फसवणूक केली जात आहे, हे शोधणे आता सायबर विभागासमोरील मोठे आवाहन आहे.ज्यांना गंडविण्यात आले ते सर्व खातेदार एसबीआयचे आहेत. त्यामुळे एसबीआयच्या खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पैसे वळते प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी माहिती बँक अधिकाºयांनी दिली आहे.