दररोज सहा मिनिटे ‘वॉक टेस्ट’ करून आपली ऑक्सिजन लेवल तपासणी करणे अगदी सहज शक्य आहे. कोरोनामुळे सर्वत्र घाबरविणारे वातावरण असल्याने घरच्या घरी अशी टेस्ट करून चिंतामुक्त राहणे शक्य आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची गरज नाही. केवळ घड्याळ आणि पल्स ऑक्सिमीटर असेल तर ही टेस्ट आपल्याला करता येते.
अनेक जण कोरोनाच्या नावाने टेस्ट करण्यासाठीही घाबरतात. अशात त्यांचा संसर्ग वाढून प्रकृती गंभीर होण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच टेस्ट केल्यास लवकर उपचार मिळून रुग्ण लवकर बरे होऊ शकतात.
असे लागणार साहित्य (बॉक्स)
घड्याळ, पल्स ऑक्सिमीटर
अशी करा चाचणी (बॉक्स)
आपल्याला बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसेच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने चालावे. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी.
...तर घ्या काळजी (बॉक्स)
सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी झाली तर...
चालणे सुरू करण्यापूर्वीच्या पातळीपेक्षा चालणे झाल्यानंतर ही पातळी तीनपेक्षा अधिकने कमी झाली तर...
चालल्यानंतर धाप येणे, दम लागल्यासारखे होत असेल तर...
तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
कोणी करायची ही टेस्ट? (बॉक्स)
सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील तर... गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी दररोज ही चाचणी करावी.
कोट