शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

खाणीची सुनावणी कोरचीत घ्या

By admin | Updated: July 11, 2017 00:39 IST

तालुक्यातील झेंडेपार लोह प्रकल्पाची सुनावणी ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे.

५०० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती : झेंडेपार प्रकल्पाबाबत तहसीलदारांर्शी चर्चालोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील झेंडेपार लोह प्रकल्पाची सुनावणी ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आली आहे. सुनावणीसाठी गडचिरोली येथे जाणे प्रत्येकच नागरिकाला शक्य नाही. त्यामुळे या प्रकल्पाची सुनावणी कोरची येथे घेण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी तहसीलदारांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे मोठ्या प्रमाणात लोहखनिज आहे. या लोहखनिजाचे खणन करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे. खाण सुरू करण्यापूर्वी या परिसरातील नागरिकांचे मत जाणून घेण्याच्या उद्देशाने ३ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. सुनावणीबाबत नागरिकांशी चर्चा करण्यासाठी राजीव भवन कोरची येथे ९ जुलै रोजी सभा आयोजित केली होती. या सभेला झेंडेपार, भर्रीटोला, नांदळी, मसेली आणि बफ्फरझोनमध्ये येणाऱ्या जवळपासच्या ३० गावचे ५०० पेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. खाणीमुळे या परिसरातील जनजीवनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सदर सुनावणीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची इच्छा वर्तविली आहे. सर्वच नागरिकांना गडचिरोली येथे ये-जा करण्याचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे सुनावणी कोरची येथेच ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे व्यक्त केली. या सुनावणीला लोहप्रकल्प कृती समितीची उपाध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, पंचायत समिती सभापती तथा कृती समितीचे सचिव कचरीबाई काटेंगे, नांदळीच्या सरपंच बबीता नैताम, कोरचीचे नगराध्यक्ष नसरूभाई भामानी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज अग्रवाल, भाजपा तालुकाध्यक्ष आनंद चौबे, नगरसेवक हिरामन राऊत, नांदळीचे उपसरपंच, श्यामलाल मडावी, झाडूराम हलामी, इजामशाही काटेंगे, जुमेनसिंग होळी, गुलाबसिंग कोडाप, पं. स. उपसभापती श्रावण मातलाम, सुखदेव नैताम, कोरची तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सियाराम हलामी, धनीराम हिळामी आदी उपस्थित होते. चर्चेनंतर मागणीचे निवेदन तहसीलदार पुष्पलता कुमरे यांना दिले.