शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे.

लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी व वडसा तालुक्यात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी होत असून, वाघाचा बंदोबस्त करून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी व मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी-वडसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघाचा वावर वाढलेला आहे. सद्यस्थितीत दोन्ही तालुक्यांत तेंदूपत्ता व मोहफुले संकलन करण्याचा हंगामी रोजगार सुरू असल्याने ग्रामस्थांना आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलात जाण्यावाचून पर्याय नाही. अशातच आरमोरी तालुक्यातील नलूबाई बाबूलाल जांगळे (रा. अरसोडा), नंदू  गोपाळ मेश्राम (रा. आरमोरी) या दोन व्यक्तींचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सध्या या दोन्ही तालुक्यांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे वनविभागाच्या नोंदीवरून दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे. तेंदुपत्ता, मोहफुले संकलन करणारे व शेतातील धान पिकाची कापणी करणाऱ्यांना मजुरांना वनविभागाकडून सुरक्षा देण्यात यावी. शेतकऱ्यांना कापणीअभावी व वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या धान, भाजीपाला व अन्य पिकांची तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आमदार गजबे यांनी आरमोरीत  उपवनसंरक्षक शर्मा यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. यावेळी पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, माणिक भोयर यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.वाघाच्या हैदाेसामुळे नागरिक भयभीत झाले असून शेतकरी ताणतणावात आहेत. वाघाचा बंदाेबस्त झाल्याशिवाय चैन पडणार नाही.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग