शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:01 IST

राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख हे १६ फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन : आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट

आॅनलाईन लोकमतआरमोरी : राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख हे १६ फेब्रुवारीला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान त्यांनी आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. शेतमाल तारण योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.याप्रसंगी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, आ. कृष्णा गजबे, ना. देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, जिल्हा नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खिरसागर नाकाडे, उपसभापती ईश्वर कासेवार, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, सहायक निबंधक मोरेश्वर गणवीर, सचिव अमिष निमजे यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी ना. सुभाष देशमुख यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या योजनांचा आढावा घेतला. शेतमाल तारण योजनेच्या गोदामाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान होणार नाही, याची काळजी बाजार समितीने घेतली पाहिजे, कर्जपुरवठ्याची आवश्यकता असल्यास आम्ही मदत करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.तारण योजना राबविण्यात आरमोरी बाजार समितीचा महाराष्ट्रातून चवथा क्रमांक लागतो, असे सांगत त्यांनी बाजार समितीच्या कार्याचे कौतुक केले. सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी सन १९९५-९६ पासून शेतमाल तारण योजना स्वनिधीतून राबवित असल्याचे ना. देशमुख यांनी सांगितले. शेतमाल तारण योजनेस निधी कमी पडू देणार नाही व समितीच्या कार्याक्षेत्रातील प्रत्येक गावात तारण योजना पोहोचवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे संचालक मुखरू वाघाडे यांनी केले तर संचालन समितीचे सचिव अमिष निमजे यांनी केले. त्यांनी बाजार समितीच्या योजनांची माहिती मंत्रीमहोदयांना सविस्तरपणे दिली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.