शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अवैेध खनन करताना पकडलेल्या ट्रॅक्टर मालकांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:37 IST

वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या शिवणी (कटंगटोला) कम्पार्टमेंट क्रमांक २६७, २८६ मधील अवैैध खनन करताना पकडलेल्या दोन ट्रॅक्टर मालकांवर वन कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी शिवणी येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देवनमंत्र्यांना निवेदन : शिवणीतील शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या शिवणी (कटंगटोला) कम्पार्टमेंट क्रमांक २६७, २८६ मधील अवैैध खनन करताना पकडलेल्या दोन ट्रॅक्टर मालकांवर वन कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी शिवणी येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दोन्ही कम्पार्टमेंटमध्ये मागील चार-पाच वर्षांपासून अवैैध खनन सुरू असून त्यास वन परिक्षेत्र अधिकारी देलनवाडी व वनरक्षकांचे अभय असून वनहक्क समित्यांना आर्थिक फायदा करून जवळपास ६० ते ७० लाख रूपयांचे गौणखनिज (गिट्टी, बोल्डर) चार ट्रॅक्टरच्या माध्यमाने खनन करून परस्पर कंत्राटदारांना विक्री केलेली आहे. एवढेच नाही तर वन विभागाने बांधलेल्या लूज बोल्डर बंधारा, नाला बडींग, डोंगर उतारावरील बांध वस्तीमधील गिट्टी व बोल्डर तसेच घुसी नाल्यालगतची गिट्टी, झिनगुणी पहाडावरील गौणखनिज याच ट्रॅक्टरमालकांनी अवैैध खनन करून परस्पर विक्री केली. नागरिकांच्या तक्रारीनंतर मोबाईल स्कॉडच्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी २४ मार्चला दोन्ही ट्रॅक्टर पकडून कुरखेडा येथील रेंज आॅफिसमध्ये आणले परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी लक्ष्मण डोंगरवार, खटू लंजे, दिलीप कापगते, शालिक मडावी, शेषराव मसराम यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.