शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

‘त्या’ लेआऊट धारकावर कारवाई करा

By admin | Updated: November 8, 2014 22:37 IST

आरमोरी येथील एका लेआऊटधारकाने सर्व्हे नं. १३२३/१ आराजी ०.३६ हेक्टर आर शेतजमिन खरेदी करून प्लॉट पाडले. नगर रचनाकाराचा मंजूर लेआऊटमध्ये ५० फुटाचा डीपी रोड असतांना सदर रोड

आरमोरी : आरमोरी येथील एका लेआऊटधारकाने सर्व्हे नं. १३२३/१ आराजी ०.३६ हेक्टर आर शेतजमिन खरेदी करून प्लॉट पाडले. नगर रचनाकाराचा मंजूर लेआऊटमध्ये ५० फुटाचा डीपी रोड असतांना सदर रोड पूर्णपणे दुसऱ्याबाजुने वळविण्यात आला. त्यामुळे मूळ मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे या प्रकारास कारणीभूत असलेल्या संबंधीत लेआऊटधारकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत सतिश गजभिये यांनी केली. पत्रकार परिषदेत माहिती देतांना गजभिये म्हणाले, डीपी रोड सर्व्हे नं. १३१५ व सर्व्हे नं. १३१६ पर्यंत सलग काढण्यात आलेला आहे. सर्व्हे नं. १३२३/१ मध्ये सदर रस्ता दुसऱ्या बाजुने वळविण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असतांनाही या नकाशाला कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, याची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी सतीश गजभिये यांनी यावेळी केली. आरमोरी येथील सहकारी बँक शाखेच्या मागे एक भूखंड अकृषक करून तेथेसुद्धा ५० फुटाचा डीपी रोड नष्ट करण्यात आला, असाही आरोप गजभिये यांनी यावेळी केला. दोन्ही पेट्रोलपंपाच्या मधून जाणाऱ्या डीपी रोडवर पूर्वेकडे डीपी रोड बंद करण्यात आला आहे. आम्ही या परिसरात राहत असल्याने या परिसरातील नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे. सदर बांधकाम बंद करून मार्ग मोकळा करण्यात यावा, याबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र कारवाई झाली नाही.याशिवाय आमरण उपोषण करण्याचे नोटीस दिल्यानंतर तत्कालीन तहसीलदारांनी उपोषण मंडपाला भेट देऊन काम बंद करण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशीही माहिती गजभिये यांनी यावेळी दिली. सदर अवैध लेआऊट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, ये-जा करण्यासाठी असलेला ५० फुटाचा मंजूर डीपी रोड खुला करण्यात यावा, अन्यथा १० नोव्हेंबरपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.आरमोरी येथील सर्व्हे नं. १३२३/१ आराजी ०.३० हेक्टर आरमध्ये माझा लेआऊट असून प्लॉट क्र. १, ३ व ४ च्या पूर्वेला १५०० मीटर रूंदीचा डीपी रोड असून सदर रोड थोड्याप्रमाणात माझ्या जागेतून गेलेला आहे. त्यामुळे सदर रस्ता आपण मोक्यावर सोडलेला आहे. सदर डीपी रोड माझ्या जागेतून जात नसल्याने त्या रोडशी आपला काहीही संबंध येत नाही, असे त्या लेआऊटधारकांनी म्हटले आहे.