शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अफरातफर करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा

By admin | Updated: December 2, 2014 23:06 IST

ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवड व अन्य कामांमध्ये सरपंचांची बनावट स्वाक्षरी घेऊन आर्थिक अफरातफर करणारे ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी,

उपोषणाचा इशारा : जि. प. सीईओंकडे निवेदनअहेरी : ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवड व अन्य कामांमध्ये सरपंचांची बनावट स्वाक्षरी घेऊन आर्थिक अफरातफर करणारे ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजाराम ग्रामपंचायतीचे सदस्य व आलापल्लीच्या ग्रा. पं. सदस्यांनी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात अब्दुल रहेमान, राजाराम ग्रा. पं. चे सदस्य ज्योती जुमनाके, भाष्कर तलांडे व आलापल्लीचे ग्रा. पं. सदस्य विजय कुसनाके यांनी म्हटले आहे की, ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी हे अहेरी पंचायत समितीतील राजाराम व खांदला ग्रामपंचायतीला ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची किष्टापूर वेल येथे बदली करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीचा प्रभार दुसऱ्या ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आला आहे. असे असतांनाही राजाराम ग्रा. पं. चे ग्रामसेवक व्ही. पी. वेलादी यांनी २३ आॅक्टोबर २०१३ रोजी २ लाख ६० हजार रूपयांची रक्कम बँकेतून काढली. धनादेशावर सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून सदर रक्कम हडप केली. सोलर दिवे खरेदीचे ४ लाख २ हजार ३९८ रूपयांची बोगस देयके तयार केली आहे. विविध बांधकामाबाबत मूल्यांकनापेक्षा जादा रक्कम खर्च करून लाखो रूपयांची अफरातफर ग्रामसेवक वेलादी यांनी केली असल्याचा आरोप ग्रा. पं. सदस्यांनी निवेदनात केला आहे. यासंदर्भात अहेरी पं. स. च्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीकरिता जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अहवाल सादर केला आहे. मात्र याबाबत ग्रामसेवकावर कोणतीच कारवाई झाली नाही.ग्रामसेवक वेलादी यांच्यावर प्रशासनाने निलंबनाची कार्यवाही करावी, अन्यथा विद्यार्थी संघटनेच्यावतीने ८ डिसेंबरपासून अहेरी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी अब्दुल रहेमान यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)