शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिविगाळप्रकरणी आरएफओवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:20 IST

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.एन. शेंडे यांनी विशेष सेवा वनपाल के.एफ. दुर्गे यांना

पालकमंत्र्यांना निवेदन : आसरअल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची चौकशी करा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.एन. शेंडे यांनी विशेष सेवा वनपाल के.एफ. दुर्गे यांना अश्लिल भाषेत शिविगाळ केली. त्यामुळे संबंधित वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना नागपूरच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांना दिले आहे. वनपाल दुर्गे यांनी बँक कर्जाच्या शिफारस पत्रावर सही करण्याची विनंती केली असता, वनपरिक्षेत्राधिकारी यांनी शिफारस पत्र फाडून टाकले व फाईल फेकून दिली. त्याचबरोबर वनपाल दुर्गे यांना अश्लिल शिविगाळ करून टाचणीचा डब्बा फेकून मारला. वनपरिक्षेत्राधिकारी हे नेहमीच वनकर्मचाऱ्यांना अपमानजनक वागणूक देत आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आरएफओवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना नागपूर व जुनी पेंशन हक्क संघटना महाराष्ट्र राज्यच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.