शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तहसीलवर विशाल मोर्चा धडकला

By admin | Updated: April 21, 2016 01:40 IST

सुरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभारण्यात यावा, या मागणीसाठी सुरजागड बचाव संघर्ष समिती एटापल्लीच्या वतीने

लोह प्रकल्प तालुक्यातच करा : बाजारपेठ कडकडीत बंद; १० हजार नागरिक सहभागीएटापल्ली : सुरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभारण्यात यावा, या मागणीसाठी सुरजागड बचाव संघर्ष समिती एटापल्लीच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानसभेचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार व राकाँचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात हजारो लोकांचा मोर्चा बुधवारी येथील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयावर धडकला. या विशाल मोर्चाचा प्रारंभ दुपारी २ वाजता राजीव गांधी शाळेच्या प्रांगणातून झाला. मुख्य मार्गावरून सदर मोर्चा एसडीओ व तहसील कार्यालयावर धडकला. दरम्यान, मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन तहसीलदार संपत खलाटे यांच्याकडे सादर केले. या मोर्चाची सांगता दुपारी ४ वाजता करण्यात आली. मोर्चादरम्यान बुधवारी एटापल्ली शहरातील बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. कडक उन्हात एटापल्ली तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आठ ते दहा हजार आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आमदार विजय वडेट्टीवार व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चात जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सगुना तलांडी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. लालसू नरोटे, सैनू गोटा, राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी पं.स. उपसभापती लालसू आत्राम, भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे, मुस्ताक शेख, चंद्रा कवडो, डोलेश मडावी, अभय पुण्यमूर्तीवार, मंगेश नरोटे, रमेश गंपावार, रामजी कत्तीवार, जितेंद्र टिकले, सुरेश तलांडे, संतोष आत्राम, मनोहर हिचामी, दौलत दहागावकर, संजय चरडुके, नसरू शेख, मुक्तेश्वर गावडे, सरीता राजकोंडावार, कमल हेडो, बबिता मडावी, रामसाय तलांडे, ऋषी पोरतेट, उषा ठाकरे, ललिता मट्टामी, सगुना कोडापे, बालाजी आत्राम, शालिक गेडाम, कैलाश कोरेत, मंगूजी मट्टामी, रामजी गुम्मा आदीसह राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)उत्खननाच्या कामात कंपनीला सरकारकडून मदत - वडेट्टीवारसंपूर्ण कायद्याचे उल्लंघन करून खासगी कंपनी सुरजागड लोह पहाडीवरून कच्चा माल चोरून नेत आहेत. या कामात कंपनीला भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार मदत करीत आहे. विद्यमान सरकारचे डोके ठिकाणावर नाही. आदिवासी जनतेच्या विकासाबाबत भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारला काहीही देणे-घेणे नाही, असे आमदार विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. सुरजागड लोह प्रकल्प पहाडी परिसरातून सुरू असलेल्या लोहखनिज उत्खननाच्या मुद्यावर आमदार वडेट्टीवार यांनी भाजप प्रणित सरकारवर प्रखर टीका केली. या आहेत मागण्यासुरजागड प्रकल्प एटापल्लीतच उभारण्यासंबंधी भूमिका स्पष्ट होत नाही, तेव्हापर्यंत सुरजागड पहाडीवरील कामे बंद करून कच्च्या लोहखनिजाची वाहतूक तत्काळ बंद करावी, शासनाच्या नियमाचे उलंघन करून जितकी झाडे संबंधित कंपनीने रस्ता बनविण्यासाठी व खोदकामात तोडली आहे. त्याच्या १० पट झाडे पुन्हा लावावीत. अन्यथा कंपनीसोबत केलेला करार रद्द करावा, ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात खनिज आहे, त्या खनिजाचे ग्रामसभेच्या मंजुरीविना उत्खनन व वाहतूक करण्यात येऊ नये. गौण खनिजाचे उत्खनन केल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर महसूल व वन विभागाने फौजदारी गुन्हे दाखल करावे.