शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलचा कारभार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:03 IST

तहसील कार्यालयामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र तहसील कार्यालयाच्या विविध विभागाचे कर्मचारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून गप्पा, गोष्टीत टाईमपास करीत असल्याने एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : कर्मचारी आपला टेबल सोडून एकत्रीत मारतात गप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तहसील कार्यालयामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र तहसील कार्यालयाच्या विविध विभागाचे कर्मचारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून गप्पा, गोष्टीत टाईमपास करीत असल्याने एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एटापल्ली तहसील कार्यालयाचा कारभार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.याबाबतचा प्रकार प्रस्तुत प्रतिनिधीला बुधवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दिसून आला. प्रतिनिधींनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली असता, एटापल्ली तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना, निवडणूक, आस्थापना आदी विभागातील अनेक कर्मचारी आपल्या खुर्च्या सोडून पुरवठा विभागात गप्पा मारत बसले होते. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालयात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास बंदी असताना येथील कर्मचारी खर्रा खात असल्याचे दिसून आले.विद्यमान सरकार गतिमान असल्याचा दावा सत्ताधारी नेते करीत आहेत. मात्र विविध शासकीय विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे व विभाग प्रमुखांचे नियंत्रण राहिले नसल्याने प्रशासकीय कामाची दिरंगाई प्रचंड वाढली आहे. परिणामी विद्यमान सरकारचा गतिमान प्रशासन व शासन असल्याचा दावा फोल ठरला आहे.निराधार योजनेचे अनेक लाभार्थी तहसील कार्यालयात कामासाठी येतात. तसेच इतर विभागातही अनेक लोक तालुक्याच्या दुर्गम भागातून येतात. मात्र संबंधित कर्मचारी आपल्या खुर्च्यांवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते.