शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या प्राणासाठी मातेचा टाहो

By admin | Updated: August 1, 2014 00:16 IST

घरातील आर्थिक स्थिती बेताची असतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितांनाच आईची परवड होत होती. त्यातच कुटुंबाची एकच आस असलेला मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त झाला आहे.

मदतीची याचना : उपचारासाठी २५ लाखांचा खर्च अपेक्षितदेसाईगंज : घरातील आर्थिक स्थिती बेताची असतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितांनाच आईची परवड होत होती. त्यातच कुटुंबाची एकच आस असलेला मुलगा गंभीर आजाराने ग्रस्त झाला आहे. ही माहिती समोर येताच आईच्या हृदयावर दु:खाचे डोंगर कोसळले. नि माहित झाले की, मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. दु:खाच्या या घटनेने आईचे हृदय हेलावून गेले. ती मदतीसाठी टाहो फोडू लागली... कुणीतरी मदत करा. ही हृदयद्रावक घटना आहे देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील. मुलाच्या उपचारासाठी २५ लाखांचा खर्च येणार, असे माहित होताच आई माया लांडगे मदतीसाठी लोकांकडे हात पसरू लागली.घरात पिढ्यान्पिढ्या दारिद्र्याचा वास असतांना रोजंदारीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाचा आधार मुलगा ठरावा म्हणून आई माया सिद्धार्थ लांडगे यांनी मुलगा पंकज सिद्धार्थ लांडगे (२२) याला १२ वीपर्यंत शिकविले. यंदाच तो १२ वीची परीक्षाही उत्तीर्ण झाला. परिस्थिती बेताची असल्याने एका खासगी रूग्णालयात रोजंदारीने काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र मागील एक महिन्यापासून तो किडनीच्या आजाराने त्रस्त होता. प्रकृती बिघडल्याने पंकजला कुरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. परंतु पुढील उपचार करण्यासाठी प्रथम गडचिरोली येथील रूग्णालयात त्यानंतर वर्धा येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु पंकजच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, यासाठी २५ लाखांचा खर्च येणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीन सरकली. रोजंदारीच्या भरवशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना २५ लाखांची रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न माया लांडगे यांना पडला. मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी दात्यांनी मदत करावी म्हणून ती अजूनही भटकत आहे. त्यामुळे उदार अंत:करणाने मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करावी, असा टाहो मायाबाई लांडगे फोडत आहेत. (तालुका प्रतिनिधी)