शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडात ‘रेती लेके जाओ’ प्रतिकात्मक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया रखडल्याने अनेक खासगी, शासकीय तसेच घरकुलांची कामे रखडली आहेत. या सर्व कामांकडे शासनाचे दुर्लक्ष असून शासनाकडून कोणतेही कार्यवाही व उपाययोजना होताना दिसून आली नाही. त्यामुळे जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दरात आवश्यक तेवढी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

ठळक मुद्दे४० ट्रॅक्टर व १० बैलबंड्यांचा समावेश : सती नदीघाटावर सविनय कायदेभंग, अनोख्या आंदोलनातून वेधले शासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दरात आवश्यक तेवढी रेती उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात नागरिकांनी कुरखेडा येथील सती नदीघाटावर ट्रॅक्टर व बैलबंड्यांच्या सहाय्याने मंगळवारी सविनय कायदेभंग करत प्रतिकात्मक स्वरूपात ‘रेती लेके जाओ’ आंदोलन करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया रखडल्याने अनेक खासगी, शासकीय तसेच घरकुलांची कामे रखडली आहेत. या सर्व कामांकडे शासनाचे दुर्लक्ष असून शासनाकडून कोणतेही कार्यवाही व उपाययोजना होताना दिसून आली नाही. त्यामुळे जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दरात आवश्यक तेवढी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीवर प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई न झाल्याने २२ सप्टेंबर रोजी मंगळवारला कुरखेडा शहराच्या सती नदी घाटावर सामुहिक रेती लेके जाओ आंदोलन करण्यात आले.दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंदेल यांच्या नेतृत्वात ४० पेक्षा जास्त ट्रॅक्टर, १० बैलबंड्यांसह अनेक लोक सती नदी घाटावर पोहोचत प्रतिकात्मक स्वरूपात ट्रॅक्टर व बंड्यांमध्ये रेती भरून रेती लेके जाओ आंदोलन केले. यावेळी शासन व प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करण्यात आला.शासकीय दरात सर्वसामान्यांना रेती उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन रेती घाटावर उपस्थित नायब तहसीलदार विनोद बोडे यांच्याकडे देण्यात आले.याप्रसंगी कुरखेडाचे पोलीस निरिक्षक सुधाकर देडे, सहायक पोलीस निरिक्षक समिर केदार उपस्थित होते. आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, सामाजिक कार्यकर्ते आशिष काळे, घिसू खुणे, कुंवर लोकेंद्रशहा सयाम, न.प. सभापती सोनू भट्टड, नगरसेवक पुंडलिक देशमुख, संजय देशमुख, अशोक कंगाली, राकेश चव्हाण, विजय पुस्तोडे, जयेंद्र चंदेल, खुशाल बन्सोड, दशरथ लाडे, जयंत बुध्दे, धर्मेंद्र परिहार, अशोक गायकवाड, कृष्णा पाटणकर, अनिल उईके, ललित मांडवे, भगवान नागपूरकर, राजू हरडे, दीपक मेश्राम, नाना झोडे, यशवंत झोडे, मुनिश्वर लांजेवार, देवानंद नाकाडे यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.जिल्हाधिकाऱ्यांना घेराव करणारसर्वसामान्य लोकांसाठी निर्माण झालेला रेती तुटवड्याचा प्रश्न जिल्हा प्रशासनाने मार्गी न लावल्यास येत्या ६ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे जिल्हाधिकाºयांना घेराव आंदोलन करणार, असा इशारा जि.प.चे माजी सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :sandवाळू