शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोन हजार शौचालय पूर्ण

By admin | Updated: July 21, 2015 02:12 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात एकूण २३ हजार ५५७ वैयक्तीक शौचालय

स्वच्छ भारत मिशन : पावसामुळे कामकाज मंदावलेदिलीप दहेलकर ल्ल गडचिरोलीस्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला २०१५-१६ या वर्षात एकूण २३ हजार ५५७ वैयक्तीक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट देण्यात आले. यापैकी आतापर्यंत केवळ २ हजार २५२ शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून तब्बल २१ हजार ३१९ शौचालयाचे बांधकाम अपूर्ण आहे. पावसामुळे जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम मंदावले असून बांधकामात प्रचंड दिरंगाई होत आहे. २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)ची सुरूवात करण्यात आली. या मिशनच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण भागातील संपूर्ण स्वच्छतेचे उद्दीष्ट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनी म्हणजे, सन २०१९ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. सन २०१९ पर्यंत राज्यातील सर्व कुटुंबांच्या घरी शौचालयाची निर्मिती करून सुंदर, स्वच्छ राज्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यातच केंद्र व राज्य शासनाकडून सदर शौचालय बांधकामासाठीचा १२ हजार रूपयाच्या अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली नाही. स्वत: जवळचे पैसे खर्च करून शौचालयाचे बांधकाम करावे लागत आहे.केंद्र सरकारकडून निधी अप्राप्तस्वच्छ भारत मिशन अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्गीय लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी केंद्र शासनाकडून नऊ हजार व राज्य शासनाकडून तीन हजार असे एकूण १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. राज्य शासनाकडून चार कोटींचा निधी जिल्हा कोषागार कार्यालयातून बीडीएसवर टाकण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र केंद्र शासनाकडून शौचालय बांधकामाच्या अनुदानाचा निधी अद्यापही प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. ग्रा.पं. सदस्यांच्या शौचालय बांधकामाची माहिती नाहीगडचिरोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात दोन टप्प्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ४५६ ग्रा.पं.पैकी अनेक ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित बहुतांश ग्रा.पं. सदस्यांकडे शौचालय नसल्याची माहिती आहे. या संदर्भात पंचायत समिती स्तरावरून जिल्हास्तरावरील स्वच्छता मिशन कक्षाने वारंवार माहिती मागितली. मात्र पं.स.स्तरावरून ग्रा.पं. सदस्यांकडे शौचालय असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली नाही. केवळ कोरची पं.स.ने याबाबतची माहिती दिली असून या तालुक्यात सर्वच ग्रा.पं. सदस्यांकडे शौचालय असल्याचे नमूद केले आहे.भामरागडात बांधकामाचा शुभारंभच नाहीभामरागड तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एकूण ९६० लाभार्थ्यांना शौचालय मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये बीपीएलधारक एसटी लाभार्थ्यांकरिता ५१७, इतर मागास वर्गीयांकरिता १२६९, एपीएलधारक एससी लाभार्थ्यांकरिता ४८६, एसटी लाभार्थ्यांकरिता ५९३ व एक हजार ५१४ अल्पभुधारक शेतकरी लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच मजूर, अपंग व विधवा महिला लाभार्थ्यांना शौचालय मंजूर करण्यात आले आहे. मात्र यापैकी एकाही लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम सुरू केले नाही. परिणामी भामरागड तालुका स्वच्छ भारत मिशनमध्ये माघारला असल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी ३० मार्चला मिळाला निधीगतवर्षी २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यात एकूण १० हजार ६६६ वैयक्तिक शौचालय मंजूर करण्यात आला. या शौचालय बांधकामाच्या अनुदानाचा निधी केंद्र सरकारकडून वर्षाअखेर ३० मार्च २०१५ रोजी मिळाला होता. निधी उशीरा मिळत असल्याने लाभार्थी शौचालय बांधकामाप्रती प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येते.तालुकानिहाय शौचालय बांधकामाची स्थितीतालुकामंजूरपूर्णअपूर्णअहेरी२,९७८१८३२,७९५आरमोरी२,३३६२२३२,११३चामोर्शी४,९२९९२७४००२धानोरा१,३७९११०१,२६९एटापल्ली१,३९५१०३१,२९२गडचिरोली३,६४०२८५३,३५५कोरची१,०२९७५९५४कुरखेडा२,२४९२११२,०३८मुलचेरा२,२४०८२२,१५८सिरोंचा४३८५३३८५