प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना कळविलेगडचिरोली : महसूूल कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावाव्या या मागणीसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र महसूल कर्मचारी संघटनेच्या निवेदनाची शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने १ मे पासून जिल्हास्तरावर साखळी उपोषण संघटनेमार्फत केले जाणार होते. परंतु राज्य कार्यकारिणीच्या वतीने महसूलमंत्री व प्रधान सचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे उपोषण मागे घेण्यात आले. या संदर्भात प्रभारी जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांना माहितीपत्र सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पदोन्नती नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपीक-टंकलेखक, वाहनचालक, शिपाई व कोतवाल यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हास्तरावर साखळी उपोषण १ मे रोजी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर सुरू केले जाणार होते. परंतु महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्री, प्रधानसचिव व वन विभाग यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. निवेदन देताना महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंदू प्रधान, एस. के. बावणे, अनमदवार, भांडारकर, सय्यद, कोल्हटकर, सोरते, धनबाते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
महसूल कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित
By admin | Updated: May 1, 2016 01:17 IST